जनतेची पिळवणूक नको; सक्तीची वीजबिल वसुली थांबवा

जनतेची पिळवणूक नको; सक्तीची वीजबिल वसुली थांबवा

पंचवटी | वार्ताहर Nashik

कोरोनाची (Corona) दुसरी लाट (second wave of corona) जाऊन जेमतेम तीन महिने उलटले नाहीत तोच तसेच शहरातील बाजारपेठा व अर्थचक्र सुरळीत होण्यासाठी अजून काही महिने बाकी असल्यामुळे नागरिकांच्या खिशात ठणठणाट असताना महावितरणकडून

(MSEDCL) त्यांची थकीत बिलाची (Exhausted bill) रक्कम एकरकमी भरण्यासाठी दबाव टाकला जात असून यापुढे नागरिकांची वीज कनेक्शन (Power connection) तोडल्यास त्याचे गंभीर परिणाम महावितरणला भोगावे लागतील असा ही इशारा आमदार राहुल ढिकले (MLA Rahul Dhikale) यांनी दिला आहे.

गेल्या दीड वर्षापासून नागरिकांना भयंकर अशा आर्थिक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मार्च २०२० मध्ये प्रथम लॉकडाऊन (Lockdown) झाल्यानंतर, एप्रिल व मेमध्ये बाजारपेठा जवळपास बंद होत्या.मोठमोठ्या कंपन्या, उद्योग, बांधकाम साईट्स या अंशत सुरू होत्या. मात्र मजूर मिळत नसल्यामुळे हे व्यवसाय जवळपास ठप्प होते.

त्यानंतर १ जून २०२० पासून महाराष्ट्र अनलॉक (Unlock) झाला मात्र कोरोनाची पहिली लाट जून ते सप्टेंबर २०२० या दरम्यान आल्यानंतर दिवाळीपर्यंत बाजारपेठा पुन्हा ठप्प झाल्या. नोव्हेंबर ते फेब्रूवारी सर्व काही सुरळीत होत असतानाच कोरोनाची दुसरी लाट आली. त्यानंतर शासनाने पुन्हा कडक निर्बंध घातल्यामुळे जून महिन्यापर्यंत अर्थ चक्र सुरळीत झाले नव्हते.

आता हळूहळू उद्योग-व्यवसाय, बाजारपेठा, बांधकाम साईटस सुरू झाल्या असल्या तरी, अर्थ चक्राला हवी तशी गती मिळालेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला चणचण भासत असून कौटुंबिक खर्च काटकसरीने करण्यावर सर्वसामान्य कुटुंबियांचा प्रयत्न आहे. अशातच आता महावितरणकडून वीज बिलाची (Electricity bill) थकबाकी एकरकमी भरण्यासाठी दबाव टाकला जात आहे.

थकबाकी न भरल्यास वीज कनेक्शन जोडण्याची भीती दाखवली जात असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मध्ये महावितरण आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) कारभाराविरोधात संताप आहे. त्यामुळे पठाणी वसुलीच्या इराद्याने येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांवर एकरकमी वीज बिलासाठी दबाव टाकू नये असे सांगताना ढिकले यांनी थकबाकीची रक्कम दोन किंवा तीन टप्प्यात वसूल केली जावी, तोपर्यंत वीज कनेक्शन तोडू नये अशी मागणी केली आहे.

वीज चोरी करणाऱ्याविरोधात प्रथम कारवाई करा

महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी विजेची चोरी होत असल्याच्या तक्रारी असून अनेक ठिकाणी घरगुती विजेचा वापर व्यावसायिक कारणासाठी केला जात असल्याची तक्रारी वाढत आहे. त्यामुळे अशा वीज चोरट्यांविरोधात प्रथम महावितरण मोहीम राबवावी व त्यानंतर प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना सवलतीने थकबाकीची रक्कम भरण्यासाठी मुभा द्यावी अशीही विनंती ढिकले यांनी महावितरणला केली आहे

Related Stories

No stories found.