गोवंश तस्करांचा बंदोबस्त करा

गोवंश तस्करांचा बंदोबस्त करा

सुरगाणा । प्रतिनिधी Surgana

सुरगाणा तालुक्यात (Surgana Taluka) गोवंश तस्करांनी (Cattle smugglers) धुमाकूळ माजवला आहे. गो तस्करी तात्काळ थांबवा अन्यथा सुरगाणा पोलीस ठाण्यासमोर (Surgana Police Station) आंदोलन (Movement) करण्यात येईल, या मागणीचे भाजपचे तालुकाध्यक्ष रमेश थोरात (BJP taluka president Ramesh Thorat) यांनी लेखी निवेदन (Written statement) सुरगाणा पोलीस उपनिरीक्षक सागर नांद्रे (Police Sub-Inspector Sagar Nandre) यांच्याकडे केली आहे.

गोवंश जनावरांची अवैध वाहतूक (Illegal transportation of animals) जोरात चालू असून कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरांची वाहतूक करणार्‍या तस्करांना पोलीस प्रशासनाचा कोणताही धाक नसल्याचे चित्र दिसत आहे. कोविडच्या भयावह संकटात ही ह्या गोवंश तस्करांकडून रात्रीच्या अंधारात बे धडक अवैध वाहतूक करून धंदे सुरू आहे. अनेक ठिकाणी पोलिसांची पेट्रोलिंग (Police patrolling), भरारी पथके कार्यरत असून देखील हा गोरख धंदा करणार्यांना आळा का बसत नाही हा प्रश्न ग्रामीण जनतेला पडला आहे,सर्रासपणे अवैध गोवंश वाहतूक सुरू आहे.

गोवंश संरक्षक कार्यकर्त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आहे. याबाबतीत वरदहस्त कुणाचा हा विषय सध्या चर्चीला जात आहे. ग्रामीण भागातील जनतेची दिशाभूल न करता पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची मागणी ग्रामीण जनतेकडून केली जात आहे. तालुक्यातील अनेक गावांतून दररोज अवैध गोवंश वाहतूक होत असून त्या कडे संबंधित प्रशासन हेतुपुरस्कर दुर्लक्ष करत आहे की काय या मुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण (Umbarthan), जामुनमाथा मार्गे मालेगाव (Malegaon) सारख्या मोठ्या शहरांकडे याची अवैध तस्करी होत असून अवैध गोवंश तस्करी रात्री बे रात्री पिकअप सारख्या वाहनांमधून होत असल्याने ह्या गावांतील नागरिकां कडून पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणाली वर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. गोवंशाची तस्करी, गोवंशाची हत्या, इतर पाळीव प्राण्यांची हत्या आणि त्यांच्या अवयवांच्या तस्करी झाल्याच्या घटना या नेहमी घडत असताना पोलीस प्रशासन कार्यवाही करत असून देखील या तस्करांनी आळा बसत नसल्याने नागरिकांमध्ये अनेक चर्चा रंगताना दिसत आहे.

अनेक ठिकाणी गावा गावात यांचे एजंट कार्यरत असल्याने हे आपल्या गोरख धंद्याला चालना देण्यात यशस्वी होत असल्याची चर्चा ग्रामीण भागातील जनतेत होत आहे. एजंट म्हणजेच हेड्यांची व गोवंश तस्करांनी संख्या दिवसनदीवस वाढत असून गोवंश तस्करीतही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे, रात्रीच्या अंधारात पाळत ठेऊन पोलीस प्रशासनाच्या नजरेआडून आपला गोरख धंदा चालवणार्‍या या गोवंश तस्करांना पोलिस प्रशासन व स्थानिक गुन्हे शाखे च्या माध्यमातून कठोर कार्यवाही करून बेड्या ठोकण्यात येणार का याकडे सुरगाणा तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले असून

या वर काय कार्यवाही होते याची दखल स्वतः जिल्हा पोलिस अधीक्षक (District Superintendent of Police) यांनी घ्यावी, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष रमेश थोरात, विजय कानडे, नगरसेवक ज्ञानेश्वर कराटे, रंजना लहरे, संजय पवार, कैलास सुयवशी, दिनकर पिंगळे, सचिन महाले,उखाराम पिठे, दिपक देशमुख, यशवंत देशमुख आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com