अटकसत्र थांबवा; गुन्हे मागे घ्या

माजी आ. आसिफ यांचे गृहमंत्र्यांना निवेदन
अटकसत्र थांबवा; गुन्हे मागे घ्या

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

त्रिपुरातील (Tripura) कथित अत्याचाराच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेला मालेगाव बंद (malegaon bandh) शांततेत पार पडत असतांना दगडफेक (stone pelting), तोडफोड करत कायदा हातात घेणार्‍या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी परंतू पोलिसांतर्फे समाजकंटकांबरोबरच बंद आयोजक व समर्थक राजकीय संघटनांच्या पदाधिकार्‍यांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात येवून अटकसत्र सुरू करण्यात आले आहे.

या कारवाईने जनतेत असंतोष निर्माण होत असल्याने सदरचे अटकसत्र त्वरीत थांबवत गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे (NCP) माजी आ. आसिफ शेख (former mla Asif Sheikh) यांनी केली आहे. मुंबई (mumbai) येथे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil), जलसंपदामंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Minority Minister Nawab Malik) यांची माजी आ. आसिफ शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष युसूफ हाजी यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने भेट घेत वरिल मागणी केली.

यावेळी मालेगाव बंदच्या दिवशी झालेल्या घटनांची माहिती मंत्र्यांना देण्यात येवून पोलीस यंत्रणेतर्फे दगडफेक, तोडफोड करीत हिंसाचार (Violence) करणार्‍या दोषींवरच कारवाई होण्याची मागणी केली गेली. बंद आयोजक तसेच पाठींबा देणार्‍या राजकीय पक्ष संघटनांच्या पदाधिकार्‍यांचा हिंसाचाराशी संबंध नसतांना पोलिसांनी त्यांच्याविरूध्द दंगलखोरांप्रमाणेच वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. तसेच मनमनी पद्धतीने अटकसत्र सुरू करण्यात आले आहे.

ज्यांचा हिंसाचाराशी संबंध नाही अशा निरपराध कारवाई केली जात असल्याने जनतेत तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे. बंद शांततेत पार पडत असतांना दुपारनंतर शिवाजी महाराज (shivaji maharaj) पुतळा, सहारा हॉस्पिटल, नवीन बसस्थानक परिसर व जुना आग्रारोडवर काही अनोळखी समाजकंटकांच्या गटाने दगडफेक व तोडफोड करून हिंसाचार घडवून आणण्याचा प्रयत्न काही मुस्लीम विरोधक जातीयवादी संघटनांनी केला.

हे समाजकंटक जिल्हा बाहेरील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हिंसाचाराची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आसिफ शेख यांनी पुढे बोलतांना केली. शांततापुर्ण मार्गाने बंद पाळणार्‍या धार्मिक (Religious), सामाजिक व राजकीय (Social and political) लोकांवर पुरावे नसतांना अटकेची कारवाई पोलिसांतर्फे होवू नये व दाखल झालेले गुन्हे त्वरीत मागे घेण्यात यावे, अशी मागणी आसिफ शेख यांनी केली. यावेळी हाजी युसूफ नॅशनलवाले, नगरसेवक असलम अन्सारी यांच्यासह राष्ट्रवादी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com