दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून एकाच्या घरावर दगडफेक

दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून एकाच्या घरावर दगडफेक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दारू (Alcohol) पिण्यास पैसे (Money) दिले नाही म्हणून एकाने समोरच्या व्यक्तीच्या घरावर दगडफेक (Stone Pelting) केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला......

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित सनी मनोहर थोरात (Sunny Manohar Thorat) (२३, रा. भेंडी गल्ली, शनी मंदिराजवळ, पेठरोड, पंचवटी) याने संतोष विष्णू यादव (Santosh Vishnu Yadav) (३८,रा.दत्त नगर झोपडपट्टी,पेठ रोड,पंचवटी) यांच्याकडून (दि.१) सायंकाळी दारू पिण्यासाठी पैसे मागितले.

यादव यांनी पैसे न दिल्याने त्याचा राग आल्यामुळे संशयित थोरात याने यादव यांच्या घरावर दगड, विटा फेकून मारल्या. यात यादव यांच्या घरातील कपाटाच्या काचा फुटून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी संशयित थोरात यास पोलिसांनी अटक (Arrested) केली असून पुढील तपास वपोनी डॉ. सिताराम कोल्हे (Dr. Sitaram Kolhe) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ए. ए. मोरे (A. A. More) करत आहेत.

Related Stories

No stories found.