अनंत चतुर्दशीला चोरीस गेलेली गणेश मुर्ती सापडली

अनंत चतुर्दशीला चोरीस गेलेली गणेश मुर्ती सापडली

वावी | प्रतिनिधी | Vavi

गणपती विसर्जनाच्या (Ganpati immersion) मध्यरात्री सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) वावी (Wavi) येथील ग्रामपंचायत समोर इच्छामणी व्यापारी ग्रुप (Ichhmani Traders Group) या गणेशोत्सव मंडळाच्या मंडपातून सव्वा किलो चांदीची श्रींची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना (दि.९) रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास घडली होती.

ही घटना घडल्यानंतर वावी पोलिसांकडून (Vavi Police) शोध मोहीम राबवण्यात आली होती. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार नाशिक (Nashik) येथून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही चौकशीसाठी दाखल झाले होते...

वावी येथील ग्रामपंचायत संकुलासमोर इच्छामणी व्यापारी ग्रुप या गणेशोत्सव मंडळाचा गणपती गेल्या १४ वर्षांपासून स्थापन करण्यात येतो. मंडळाने आठ ते दहा वर्षांपूर्वी चांदीची सव्वा किलो वजनाची श्रींची मूर्ती बनवली होती. या उत्सवादरम्यान ही मूर्ती दहा दिवस मंडपात स्थापित करण्यात आली होती.

मात्र दि. ९ रोजी पहाटेच्या सुमारास गावातील एका चोरट्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत रात्रभर राहून रात्रगस्तीस असणारे होमगार्ड व मंडळाचे कार्यकर्ते यांची झोपण्याची वाट पाहत पहाटेच्या सुमारास मंडपाच्या पाठीमागच्या बाजूने पडदा वर करून प्रवेश करत श्रींची मूर्ती चोरुन नेली होती.

त्यानंतर ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील चोरट्यांचा (Thief) कुठलाही मागमुस दिसत नव्हता. यानंतर सकाळी ६ वाजेच्यावेळी मंडळाचा कार्यकर्ता बाहेरील लाईट बंद करण्यासाठी आला असता त्याला गणपतीची चांदीची मूर्ती गायब असल्याचे आढळून आले.

त्यांने लागलीच बाहेर असलेल्या होमगार्डना ही माहिती दिली. तसेच बाजूच्या व्यापारी संकुलात असणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांनाही सांगितले. मूर्ती चोरीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत परिसरात गर्दी केली होती.

यासंदर्भात विभागीय पोलिस उपअधीक्षक सोमनाथ तांबे (Somnath Tambe) यांनी स्वत घटनास्थळी दाखल होत पाहाणी केली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Hemant Patil) यांच्यासह आठ ते दहा जणांचे पथक वावीत बोलविण्यात आले.

तसेच पोलिसांकडून काही स्थानिक तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केली असता यापैकी अक्षय अंकुश रहाटळ (२७) (Akshay Ankush Rahatal) याने श्रींची मूर्ती चोरल्याचे सांगितले. त्यानंतर ती मूर्ती पोलिसांच्या ताब्यात दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात भा.द.वि.३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला केला.

दरम्यान, या कारवाईसाठी विभागीय पोलीस उपाधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे (Local Crime Branch) पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय सोनवणे, प्रकाश गसवळी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com