'स्टाईस'चे नवदुर्गा उद्योगिनी पुरस्कार जाहीर

उद्या पुरस्कार वितरण
'स्टाईस'चे नवदुर्गा उद्योगिनी पुरस्कार जाहीर

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

मुसळगाव Musalgaon येथील सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्यावतीने STICE वसाहतीतील नऊ महिला उद्योजिकांना नवदूर्गा उद्योगिनी पूरस्कार जाहीर Navdurga Udyogini Awards करण्यात आले असून मंगळावारी (दि.12) दुपारी 2 वाजता संस्थेच्या सभागृहात पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षा सुधा माळोदे यांनी दिली.

सैनिक अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजच्या संचालिका सुरेखा त्रिभुवन-उन्हाळे यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. आदिमा ऑरगॅनिक्सच्या संचालिका शरयू देशमुख, रेव फार्माच्या भागीदार अंजली मिलिंद कटारिया, सायटेक फूड्सच्या संचालिका उत्तरा पुरंदरे-जाधव, सॅन्प्रस हेल्त केअरच्या संचालिका सुनंदा वामन मुटकुळे, विविधा बायोटेकच्या संचालिका योगिता अविनाश महाजन,

शिवाई अ‍ॅग्रो केम प्रॉडक्टसच्या मीरा अरुण डावखर, आर. बी. एन्टरप्रायजेसच्या विना प्रविण देशमुख यांना नवदुर्गा उद्योगिनी पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. एकविरा इंजिनिअरींग अ‍ॅन्ड वर्क्सच्या भागीदार कै. मीना बाळासाहेब देशमुख यांना मरणोत्तर नवदुर्गा उद्योगिनी पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासकीय मंडळाचे उपाध्यक्ष नारायण पाटील, सदस्य संजय शिंदे, व्यवस्थापक कमलाकर पोटे यांनी केले आहे

.

Related Stories

No stories found.