स्टाईस निवडणूक : तीन पॅनलमध्ये होणार रंगतदार लढत

17 जणांची माघार; 12 जागांसाठी 36 उमेदवार
स्टाईस निवडणूक : तीन पॅनलमध्ये होणार रंगतदार लढत

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ( STICE Elections ) माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत 17 उमेदवारांनी माघार घेतल्याने संचालक मंडळाच्या 12 जागांसाठी 36 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तीन पॅनलमध्ये निवडणूक होणार असल्याने ही निवडणूक चांगलीच रंगतदार बनली आहे.

माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत कारखानदार गटातून विठ्ठल जपे, संदीप नामकर्ण आवारे, शिवाजी रामचंद्र आवारे, राजेश रामनाथ खुळे, विश्वनाथ बाळाजी खतोडे, विलास माधवराव मोगल, सूरज प्रल्हादराव देशमुख, संदीप लक्ष्मण तासकर यांनी माघार घेतल्याने या गटातील सात जागांसाठी 21 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. भटक्या विमुक्त गटातून राजेंद्र दगडू आव्हाड यांनी माघार घेतल्याने या जागेवरही आता तिरंगी लढत होणार आहे. माजी व्हा. चेअरमन मीनाक्षी दळवी यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली असून त्यांचे पती बाबासाहेब दळवी कारखानदार गटातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

दळवी यांच्यासह जयश्री सुरेंद्र पटेरिया व वीणा प्रवीणचंद्र देशमुख यांनीही माघार घेतल्याने महिला राखीव गटातील दोन जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात राहिले आहेत. इतर मागास प्रवर्गातून अविनाश तांबे, प्रमोद महाजन, सुधीर साळवेकर यांनी माघार घेतली असली तरी कारखानदार गटातून ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माजी संचालक प्रभाकर बडगुजर व माजी चेअरमन पंडित लोंढे यांनी माघार घेतली असली तरी इतर राखीव गटातून त्यांनी निवडणूक रिंगणात राहणे पसंत केले आहे. स्टाईस निवडणुकीची तयारी पूर्णत्वाकडे गेलेली आहे. त्यामुळे ही निवडणूक सध्या चर्चेच्या स्थानी आहे. तालुक्यात सोसायटी, इतर संस्थांच्या निवडणुकाही सुरू असल्याने लढत लक्षवेधी ठरतात.

तीन पॅनलमध्ये लढत

स्टाईसचे माजी सरव्यवस्थापक व माजी संचालक नामकर्ण आवारे यांच्या नेतृत्वाखालील सहकार उद्योग विकास आघाडी, प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षा सुधा माळोदे-गडाख, माजी चेअरमन अविनाश तांबे, पंडित लोंढे यांच्या नेतृत्वाखालील उद्योजक विकास पॅनल, माजी चेअरमन दिलीप शिंदे, माजी व्हा. चेअरमन किशोर देशमुख यांच्या नेतृत्वाखालील ‘स्टाईस बचाव पॅनल’मध्ये ही लढत होणार आहे. रविवारी (दि.3) या तीनही पॅनलला निशाण्यांचे वाटप करण्यात येईल आणि त्यानंतर खर्‍या अर्थाने प्रचाराला प्रारंभ होणार आहे.

रिंगणातील उमेदवार

सर्वसाधारण गट-नामकर्ण आवारे, अरुण चव्हाणके, सुनील कुंदे, श्रीहरी नावंदर, कैलास हांडोरे, महेंद्र क्षत्रिय, अविनाश तांबे, चंद्रभान हासे, बाबासाहेब दळवी, सुनील जोंधळे, प्रमोद महाजन, कैलास वाकचौरे, अतुल अग्रवाल, माधव घोटेकर, किशोर देशमुख, संजय शिंदे, विजय सपकाळ, अविनाश डोखळे, सुधीर साळवेकर, दिलीप शिंदे, चंद्रशेखर गुंजाळ.

अनुसूचित जाती-जमाती- मधुकर जगताप, संदीप पगारे, सुधीर वाकचौरे

भटक्या विमुक्त- रामदास दराडे, रामदास डापसे, करणसिंग पाटील

इतर मागासवर्ग- प्रभाकर बडगुजर, पंडित लोंढे, सूरज देशमुख

महिला राखीव- सिंधू नामकर्ण आवारे, सुनंदा वामन मुटकुळे, अलका विठ्ठल जपे, सुधा विजय माळोदे, विजया बंडू पगार, मीरा अरुण डावखर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com