
देवळाली कॅम्प । वार्ताहर | Devali Camp
भगूर (bhagur), देवळाली कॅम्प (Devali Camp) रस्त्यावर ट्रकमधून मल कचरा (Fecal waste) (नाल्याचा मलबा) रस्त्यावर पडल्याने या रस्ताने ये -जा करणार्या वाहतुकीचा खोळंबा (traffic jam) झाला होता. दरम्यान त्या ट्रक (डंपर) बाबत पोलीस (police) व छावणी प्रशासनाकडे (Camp Administration) कोणतीही माहिती नाही.
सोमवारी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान कोणताही नंबर नसलेल्या ट्रकमधून लॅमरोड (Lam road) वरील एका मोठ्या व्यावसिकाच्या मोठ्या घरातून मल कचरा वाहतूकिसाठी (Garbage transportation) ट्रक, जेसीबी कार्यरत करण्यात आले होते. तो मल कचरा वाहतुक ट्रकमधून (Truck) वाहत असतांना संसरीनाका, रेस्ट कॅम्प रोडहून भगूरकडे जातांना बसथांबा, नागझिरा नाला, तर चंद्रमणी नगर बसथांब्याजवळ तर मोठ्या प्रमाणात मल कचरा पडला.
भगूर-देवळाली कॅम्प दरम्यान प्रवास करणार्या सर्वांना नाकावर हात ठेवून रस्त्यावर पडलेल्या मलाच्या बाजूने प्रवास करावा लागत होता. रस्त्यावर मल पडल्याप्रकरणी देवळाली छावनी परिषदेकडे कोणतीही नोंद नव्हती. रस्त्याने जाणार्या जेसीबी चालकाने रस्त्यावर पडलेला मल बाजूला काढल्याने वाहतूकीचा झालेला खोळंबा दोन तासांनी सुरळीत झाला.
वाहतूक विभागाचे दुर्लक्ष
या भागात क्षमतेपेक्षा अधिक मल कचरा वाहणार्या गाड्यांकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष असल्याने अशा घटना होतच राहतील याकडे शहर वाहतूक विभागाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले.