
वावी । वार्ताहर
तालुक्यातील निराळे येथे दिवाबत्तीच्या नावाखाली देवस्थानच्या माती चोरी केल्याचा प्रकार घडला असून याबाबत वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तालुक्यातील निराळे येथील पुरातन राम मंदिर असून या मंदिराची जवळपास 7 हेक्टर 39 आर इतकी जमीन असून सदर जमीन ही सन 1906 सालापासून गावातील ट्रस्टकडे सदर जमीन कसण्यासाठी होती.
मात्र या मंदिराच्या सर्व ट्रस्टी मयत झाल्यामुळे निराळे ग्रामस्थांच्या वतीने सदर जमीन ही दोन-तीन किंवा पाच वर्षाकरिता तोंडी बोली करून खंडाने देण्यात आली व त्यातून मिळणारा पैसा मंदिराची दिवाबत्ती व देखभालीसाठी व वापरण्यासाठी या खर्चाचे नियोजन करण्यात आले होते त्यावर सदर जमीन ही गावातील शेतकरी व भाजीपाला विक्रेते गोटीराम शंकर सांगळे यांना ही जमीन पाच वर्षासाठी खंडाने देण्यात आली आहे व खंडाने देतेवेळी ग्रामस्थांनी नियम आटी-शर्ट लागू केल्या होत्या.
मात्र संबंधित शेतकरी याने कुठल्याही नियम अटी व शर्ती न जुमानता या गटातील जवळपास दोन एकर क्षेत्रातील माती परस्पर विकण्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे गट नंबर 701 मध्ये पाणी योजनेची पाईपलाईन जात असून त्या पाईपलाईन साठी कमीत कमी 15 ते 20 खोल खड्डा करण्यात आला असून त्या खड्ड्यातील संपूर्ण माती सांगळे यांनी आपल्या शेतात वापरली व विकल्याचा देखील आरोप ग्रामस्थांनी केला आहे. व्यवस्था आणि ग्रामस्थ यांनी सगळ्यांना माती का विकतो याचा जाब विचारला असता सांगळे यांनी अरेरावी व दादागिरी ची भाषा वापरत माती उपसण्याचे काम सुरूच ठेवले व जवळपास दोनशे डंपर इतकी माती विकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
यावरून देवस्थानची माती विकल्या कामे येथील ग्रामस्थ अर्जुन त्रंबक केकाण यांनी देवस्थानची माती चोरी केल्याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात भा.द.वि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक तपास वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आहेर हे करत आहेत.
तसेच या कामी फिर्यादी व त्यांचे सहकारी ज्ञानदेव केकान, बाळासाहेब काकड ,बाळासाहेब सहादू काकड ,बबन देशमुख ,संदीप देशमुख ,देविदास वाघ ,अण्णा काकड भरत थोरात व इतर ग्रामस्थ यांनी याबाबत येथील तलाठी व मंडळ अधिकारी यांना व्हिडिओ शूटिंग व फोटो पुरावे देऊन देखील महसूल विभागाकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे सदर प्रकार हा जिल्हाधिकार्यालयात अर्ज निशी दाखल करण्यात आल्याचे समजले जाते.