आहार
आहार |unknown
नाशिक

आहार आणि विहाराच्या साथीने तंदुरुस्त राहा!

योगतज्ज्ञ आणि वैद्यांचा सल्ला

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

श्रावणाच्या रिमझिम सरीचे स्वागत करतांना निसर्ग नटला आहे. हा ऋतुसंधीचा काळ आहे. या काळात आपण योग्य आहार आणि विहाराच्या साथीने शरीर तंदुरुस्त राखू शकतो आणि प्रतिकारक्षमता वाढवू शकतो असा सल्ला योग आणि वैद्यांनी दिला आहे. योगात दिलेले श्वसनाचे व्यायाम तंदुरुस्तीसाठी अतिशय उपयुक्त ठरतात. त्यात प्रामुख्याने ध्यानधारणा, कपालभाती, भस्त्रिका, अनुलोम विलोम व जलनेती हे व्यायाम प्रामुख्याने केले पाहिजे.

जेणेकरुन फुफुसांची ऑक्सिजन घेण्याची क्षमता वाढते. या योग पध्दतीमुळे नाक व श्वास नलिकेतील विषाणू बाहेर सोडले जातात. शरीर बळकटीसाठी रोज सुर्यनमस्कार घालावे असे योग मार्गदर्शक सांगतात. योगा बरोबरच आहार पध्दत महत्वाची आहे. वातावरणातील बदल लक्षात घेता या काळात आहाराची काही पथ्ये पाळायला हवीत. गव्हा ऐवजी बाजरी व तांदूळाचे पदार्थ यांना स्थान द्यावे. हे दोन्ही घटक पचनास हलके असतात.

पालेभाज्यांऐवजी सुरण, गाजर, शेवगा, भोपळा या भाज्या आहारात समाविष्ट कराव्यात . ओल्या नारळाचे पदार्थ सेवन करावेत. कैरीच्या लोणच्याऐवजी लिंबाचे लोणचे खावे. उपवासाला रताळे, राजगिर्‍याचे लाडू, साबूदाणा खिचडी ऐवजी खिरीचे सेवन करावे. जेणेकरुन शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढेल. ध्यानधारणा, कपालभाती, भस्त्रिका, अनुलोम विलोम, जलनेती असा श्वसनाशी निगडित योगा करावा.

जेणेकरुन श्वसनसंस्था उत्तम राहते.अशोक देशपांडे, योग मार्गदर्शकश्रावणात आहार पथ्यपाणी जपावे. पचनास हलका आहार घ्यावा. कडधान्य व रानभाज्यांचे सेवन करावे जेणेकरुन पित्त होणार नाही व रोगप्रतिकारक क्षमता वाढेल.- नीलिमा जाधव, वैद्य

Deshdoot
www.deshdoot.com