नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायत निवडणुका सुरू असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होऊ घातल्या आहेत. अशा सर्वच निवडणुकांमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत निवडणूक व मतदान पक्रियेपर्यंत जागृत रहावे,असे आवाहन निरीक्षक म्हणून योगेंद्र पाटील यांनी केले.

नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीची ग्रामपंचायत व नगरपंचायत निवडणूक आढावा बैठक काँग्रेस भवन, महात्मा गांधी रोड, नाशिक येथे झाली.त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीसाठी निरीक्षक म्हणून योगेंद्र पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना बैठकीत तालुका अध्यक्ष यांनी मांडलेली ही भूमिका योग्य व स्वागतार्ह असून केंद्र सरकारने शेतकऱ्यां विरोधात केलेल्या काळया कायद्याच्या विरोधात मतदान करा व काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे ठामपणे उभे रहा,असे आवाहन केले.

नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तुषार शेवाळे यांनी या बैठकीचे प्रास्ताविक करताना विश्वासात घेऊनच निर्णय होत असेल तर आणि तरच अन्यथा काँग्रेस पक्ष स्वबळावर ग्रामपंचायत आणि नगरपंचायत लढण्याची भूमिका स्पष्ट केली.

यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री शोभा बच्छाव, शरद आहेर, रमेश कहांडोळ, दिंगबर गिते, ज्ञानेश्वर काळे, संपत वक्ते, दिनेश चौथवे, अलमेश शेख, रौफ कोकणी, वामन खोसकर, गोपाळ लहांमगे, जनार्दन माळी, बाळासाहेब कुक्कड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

बैठक सुरू करण्यापुर्वी कॉंग्रेस नेते अहमद पटेल, मोतीलाल व्होरा, शेतकरी आंदोलनावेळी काही शेतकरी दगावले तसेच सिमेवर लढणारे शहिद झालेले सैनिक सैनिक यांना श्रद्धांजली अर्पण करून बैठकीची सुरुवात झाली.

बैठकीत डॉ. शोभा बच्छाव, शरद आहेर, रमेश कहांडोळ, ज्ञानेश्वर काळे आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी अनुसूचित जाती विभागाच्यावतीने ज्ञानेश्वर काळे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री यांना लिहिलेल्या मागासवर्गीय व आदिवासी सर्वांगीण विकासासाठी निधी उपलब्ध करुन द्या.याबाबत अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. तसेच काही पदाधिकारी निवडीचे पत्र ह्या बैठकीत देण्यात आले.

या बैठकीत सुनील आव्हाड, महेंद्र हिरे, दिलीप पाटील, अॅड. समीर देशमुख, याकुब शेख, मधुकर शेलार, संजय जाधव, तुकाराम जाधव, राजेंद्र ठाकरे, किशोर कदम, समाधान पाटील, रामदास धांडे, प्रशांत बावीस्कर आदीं तालुका अध्यक्षांनी आढावा देताना वरिष्ठ स्थरावरुन मंत्री महोदयांनी किमान मानसिक मनोबल देण्यात यावे, अशा सुचना केल्या.

बैठकीसाठी सुमित्रा बहिरम, रश्मी पालवे, मनिषा मालुंजकर, विशाल जाधव, सखाराम भोये, संजय खैरनार, प्रितम पटणी, वाळु पाटील, गुलाब जाधव, आंनदा डवरी, धर्मराज जोपळे, उत्तम भोसले, दिलिप आहेर, प्रकाश पिंगळ, प्रभाकर पवार, दत्तात्रय खैरनार, रविंद्र पवार, सुनिल निकाळे, प्रकाश पगार, अंबादास ढिकले, अशोक शेंडगे, सुहास सुरळीकर आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सुत्रसंचलन स्वप्निल पाटील यांनी केले तर आभार रमेश कहांडोळ यांनी मानले.