वीज वितरण अधिकार्‍यांच्या खुर्चीला निवेदन

वीज वितरण अधिकार्‍यांच्या खुर्चीला निवेदन

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

तालुक्यात महावितरणकडून (MSEDCL) सध्या थकीत वीजबिल वसुलीसाठी (Electricity bill recovery) कुठलीही पुर्वसुचना न देता शेतकर्‍यांच्या कृषी पंपाचा (agricultural pump) विज पुरवठा खंडीत (power outage) केला जात आहे. यामूळे संतप्त झालेल्या मनसेच्या (MNS) पदाधिकार्‍यांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन निवेदन (memorandum) देण्याचा निर्णय घेतला. मात्र, अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीलाच (chair) निवदेन देत निषेध व्यक्त करण्यात आला.

महावितरणने शेतकर्‍यांना कोणतीही पुर्वसूचना किंवा परिपत्रक न देता कृषी पंपाची विज खंडीत करण्याचा सपाटा सुरु आहे. सध्या शेतकर्‍यांची (farmers) कांदा (onion) लागवड सुरु असतांना रोहित्रांचा विज पुरवठा खंडित करण्यात येत असल्याने पाण्याआभावी लागवड केलेले कांदा रोपे जळून जात आहेत. या विरोधात मनसेचे तालुकाध्यक्ष विलास सांगळे यांच्या नेतृत्वाखाली महिला तालुकाध्यक्ष अ‍ॅड. भाग्यश्री ओझा, शरद घुगे, तालुका उपाध्यक्ष धनंजय बोडके,

एकनाथ दिघे, अमित कांबळे, सचिन भगत निवेदन देण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात गेले. कार्यालयात कोणतेही अधिकारी उपस्थितीत नसल्याने चक्क अधिकार्‍यांच्या रिकाम्या खुर्चीलाच यावेळी निवेदन देण्यात आले. महावितरण कंपनीने घरगुती ग्राहाकांना व शेतकर्‍यांना अव्वाच्या-सव्वा बिल देऊन विज बिल वसुली सक्तीची केली असून

ही कार्यवाही तात्काळ थांबवावी अन्यथा शेतकर्‍यांसोबत महावितरण कंपनीवर धडक मोर्चा काढण्याचा इशारा निवदेनात देण्यात आला आहे. शेतकरी बांधवानी आपल्या न्यायहक्कासाठी संघटित होण्याचे आवाहन पदाधिकार्‍यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com