मका खरेदी बाबत तहसीलदारांना निवेदन

मका खरेदी बाबत तहसीलदारांना निवेदन

विंचूर। वार्ताहर vinchur / Lasalgaon

केंद्र सरकारच्या फेडरेशन मार्फत लासलगाव येथे मका हमीभावाने खरेदी केंद्र सुरू आहे. परंतु नोंदणीकृत शेतकर्‍यांच्या मका खरेदीमध्ये वशिलेबाजी होत आहे. त्यामुळे नोंदणीकृत शेतकर्‍यांचीच हमीभावाने मका खरेदी करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास समितीचे उपजिल्हाध्यक्ष विष्णू साबळे यांनी निफाड तहसीलदारांना दिला आहे.

लासलगाव येथे फेडरेशनच्या सुचनेप्रमाणे यापूर्वी हमीभावाने मका खरेदी केंद्र सुरू होते. परंतु त्या खरेदी केंद्रावर लासलगाव खरेदी केंद्राचे संचालक तसेच काही स्वयंघोषित पुढारी यांनी फेडरेशनची सुचना नसतांना मका विक्री केलेली आहे. त्यामुळे अनेक सामान्य व गरजू शेतकरी या मका खरेदी प्रक्रियेतून वंचित राहिले होते.

केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या आग्रहास्तव पुन्हा लासलगाव येथे मका खरेदी केंद्र सुरु केली असून या वशिलेबाजांनी अगोदरच खरेदी केंद्रावर मका आणून ठेवलेला असून त्याचे मोजमाप आज रोजी सुरु आहे.

त्यामुळे उर्वरित शेतकरी पुन्हा वंचित राहणार आहेत. ही अत्यंत गंभीर बाब असून बेकायदेशीर कामास पायबंद घालावा तसेच मका घेवून येणार्‍या ट्रॅक्टरच्या लाईनमध्ये स्थानिक पुढारी दादागिरी करतात. त्यामुळे आपण लासलगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस यंत्रणेची मदत घेऊन सदर मका खरेदी केद्रावर सुरु असलेली स्थानिक पुढार्‍यांची दादागिरी बंद करुन गरीब व गरजू शेतकर्‍यांना न्याय मिळवून द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com