पालघर प्रकरणावरून आदिवासी तरुण एकवटला..!

पालघर प्रकरणावरून आदिवासी तरुण एकवटला..!

त्र्यंबक तहसीलदारांना निवेदन

नाशिक । Nashik

पालघर येथील पोलीस हवालदार आत्महत्येची चौकशी करून सदर पोलीस अधिकाऱ्यास निलंबित करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी संघटनानी तहसीलदार दीपक गिरासे व उपविभागीय अधिकारी भीमाशंकर ढोले यांना दिले.

दरम्यान मयत सखाराम चौधरी यांच्या मृत्यूची लवकरात लवकर चौकशी न झाल्यास त्र्यंबक आदिवासी संघटनाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याचप्रमाणे मयत चौधरी यांचे कुटुंबियांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लावावा अशी मागणीही यावेळी निवेदन कर्त्यांनी केली आहे.

यावेळी मयत चौधरी यांच्या वडिलांसह त्यांचा मुलगा उपस्थित होते. तसेच त्र्यंबक तालुक्यातील लोकप्रतिनिधींसह तरुण एकवटला होता.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com