वाजगाव l Vajgaon (वार्ताहर)

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघ शाखा–देवळा तालुका संघाचे विविध प्रलंबित मागण्याचे व तक्रार निवारण बैठकीचे आयोजन करण्यात यावे यासाठी देवळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

देवळा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांचे किमान वेतन व विशेष राहणीमान भत्ता मोठ्या प्रमाणात थकीत आहे. या बाबत कर्मचारी यांनी विनंती अर्जाद्वारे ग्रा. पं.कडे मागणी करून अदयाप मिळाले नाही.

तसेच मागील किमान वेतन उशिरा अदा केल्यामुळे वेतन व राहणीमान भत्ता फरक कर्मचाऱ्याना अद्यापही मिळालेला नाही.

तसेच ग्रामविकास विभागाच्या दि. ०९ मे २०१८ व २२ मे २०१८च्या पत्रान्वये ग्रा. पं. कर्मचाऱ्यांची ऑनलाईन वेतन प्रणालीमध्ये माहिती भरणे आवश्यक होते. परंतु अद्यापावेतो सदर माहिती योग्य पद्धतीने भरली जात नाही. परिणामी कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन वेतन वेळेत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होत नाही. व दि. २५ एप्रिल २००७च्या अनिसुचने नुसार किमान वेतन व मागील वेतन फरक अदा व्हावा.

कर्मचारी वर्गवारी

मुळ किमान वेतन दर (दरमहा रुपये)

परिमंडळ - १(१०००० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती)

परिमंडळ - २ (५००० ते १०००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती)

परिमंडळ - २ (५००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती)

१

कुशल

१४१२५

१३७६०

१२६६५

२

अर्धकुशल

१३४२०

१३०५५

११९६०

३

अकुशल

१३०८५

१२७१५

११६२५

निवेदनावर नाशिक जिल्हाध्यक्ष सखाराम दुर्गुडे, सरचिटणीस उज्ज्वल गांगुर्डे, देवळा तालुकाध्यक एस. ए. देवरे, उपाध्यक्ष भाऊसाहेब आहेर, सचिव महेंद्र बच्छाव, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

यावेळी बापू गरुड, प्रकाश शिंदे, पवन सुर्यवंशी, एकनाथ बच्छाव, दादा सावंत, हिलाल गरुड, ईश्वर मोरे, संजय कुवर, भीमराव केदारे, सतिश अहिरे, समाधान केदारे, राजू खरे, राजेंद्र पवार आदि कर्मचारी उपस्थित होते.