सिडको कार्यालयाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या 'या' सूचना

बाळासाहेबांची शिवसेना महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन
सिडको कार्यालयाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या 'या' सूचना

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

सिडकोने ( Cidco ) ‘लिज होल्डने’ दिलेली घरे ‘फ्री होल्ड’ करून घरधारकांना संपूर्ण मालकी मिळेपर्यंत सिडको प्रशासकीय कार्यालय ( Cidco Office ) सुरूच ठेवण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath shinde ) यांच्याकडे बाळासाहेबांची शिवसेना महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे ( Pravin Tidme ) यांनी केली. रविवारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन तिदमे यांनी निवेदने दिले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महानगर प्रमुख प्रविण तिदमे यांनी म्हटले आहे की, नवीन नाशिक येथे सिडकोने सदनिका धारकांना ९९ वर्षे कराराने २५ हजार घरे विकली असून सुमारे ५ हजार वेगवेगळया वापरांचे भूखंड वाटप केलेले आहेत. तसेच वेगवेगळया ठिकाणी अंदाजे १ हजार ५०० टपरी भूखंडे देखील वाटप केलेली आहेत.

सिडकोने ‘लिज होल्डने’ दिलेली घरे ‘फ्री होल्ड’ करून घरधारकांना संपूर्ण मालकी द्यावी, अशी सिडकोवासियांची अनेक वर्षांपासून मागणी आहे. छोट्या छोट्या घरांत राहणार्‍या सिडकोवासियांचा कुटुंब विस्तार वाढल्याने घराचाही विस्तार वाढवावा लागतो. वाढीव बांधकाम करतांना या कामगार व अल्प उत्पन्न गटातील घरधारकांना कर्ज काढावे लागते. मात्र, लिज होल्ड मालमत्ता असल्याने अनेक बँका कर्ज देत नाहीत. काही वित्त संस्था याचा लाभ उठवत जास्त व्याजदराने कर्ज देऊन पिळवणूक करतात.

लिज होल्ड ऐवजी ‘फ्री होल्ड’ मालमत्ता झाल्यास घरधारकाला घराचा पुनर्विकास करणे सुलभ होईल. तसेच, फ्री होल्डची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय सिडको प्रशासकीय कार्यालयाचे कामकाज बंद करू नये, अशी विनंती महानगर प्रमुख तिदमे यांनी केली आहे. यावेळी, शिवसेना सचिव संजय माशेलकर, नाशिक लोकसभा संपर्क प्रमुख जयंत साठे, संपर्क प्रमुख संजय बच्छाव, जिल्हा प्रमुख अनिल ढिकले, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक लक्ष्मी ताठे, महानगर प्रमुख अस्मिता देशमाने, युवासेना जिल्हा प्रमुख योगेश म्हस्के, सदानंद नवले, अ‍ॅ‍ॅड. श्रद्धा जोशी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

जो पर्यंत या विषयाचा निर्णय होत नाही तोपर्यंत सिडको कार्यालय नाशिक येथेच सुरु ठेवावे अशा सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याने तूर्तास तरी सिडकोच्या सदनिका धारकांना दिलासा मिळाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com