देवळाली कॅम्प l Deolali Camp (वार्ताहर) :

येथिल ऐतिहासिक बुद्ध विहार (ज्ञान मंदिर)च्या समोरील कॅन्टोनमेंट बोर्डाची जागा कायदेशीर रित्या बुद्ध विहारास हस्तांतरीत करणे तसेच इतर विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देणे कामी केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री रामदास आठवले यांना रिपाई शिष्टमंडळाने साकडे घातले.

रिपाईचे उत्तर महाराष्ट्रचे सरचिटणीस विषवनाथ काळे यांचे नेतृत्वाखाली शिस्तमंडळाने आठवले यांची मुंबईत भेट घेतली. देवळाली कॅम्प येथील ज्ञान मंदिरास केंद्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त सुमारे 68 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला होता.

या वास्तूचे काम पूर्णत्वास गेले असून ज्ञान मंदिरासमोर असलेली जागा ही कॅन्टोन्मेंनची असून सदर जागा ज्ञान मंदिरासाठी मिळावी या बाबद रक्षा मांत्रालय यांचे कडे समितीने प्रस्ताव दाखल केलेला आहे.

याबाबत पाठपुरावा व्हावा तसेच देवळाली शहराच्या विविध लोकोपयोगी कामासाठी केंद्रीय समाज कल्याण खात्या अंतर्गत कॅन्टोनमेंट बोर्डास निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी आरपीआय शस्तमंडळाने आठवले याना साकडे घातले.

या बाबत आपण निश्चित पाठपुरावा करू असे आश्वासन त्यांनी शिष्ठमंडळास दिले शिष्ठमंडळात महाराष्ट्र प्रदेश नेते विश्वनाथजी काळे, ऊत्तर महाराष्ट्र नेते सिध्दार्थ पगारे, तालुका उपाध्यक्ष अशोक साळवे, माजी शहराध्यक्ष गौतम भालेराव, शहराध्यक्ष पंडित साळवे, संजय मोरे आदि सहभागी झाले होते.