ग्रामीण रुग्णालयातील सेवकांचे जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन

ग्रामीण रुग्णालयातील सेवकांचे जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

ग्रामीण रुग्णालयाच्या Sinnar Rural Hospital वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा लहाडे Medical Officer Dr. Varsha Lahade यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात निवेदन देऊनही जिल्हा शल्यचिकित्सक कुठलीही कार्यवाही करत नसल्याच्या निषेधार्थ ’काम बंद’ करण्याचा इशारा देणारे पत्र रुग्णालयातील सेवकांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना पाठवले आहे. ’कोविड’च्या संकटाच्या काळात हा पर्याय योग्य वाटत नसल्याने जिल्हा शल्यचिकित्सकांनी स्वतः लक्ष घालून तात्काळ निर्णय घ्यावा असे आवाहनही या निवेदनात करण्यात आले आहे.

डॉ. लहाडे यांच्या कारभाराच्या विरोधात रुग्णालयातील कायम कंत्राटी सेवकांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन पाठवत एकूणच त्यांच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी केली होती. या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सकांनी दोन सदस्यीय चौकशी समिती नेमली असली तर आजपर्यंत या समितीचा एकही सदस्य चौकशीसाठी आला नसल्याकडे शल्य चिकित्सकांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

डॉक्टर लहाडे यांच्या विरोधात तक्रार करणार्‍या सेवकांवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे. सेवकांवर दबाव आणल्यास रुग्णालयात काम करणे अशक्य होणार असून काम बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. सध्याच्या ’कोरोना’च्या संकट काळात असा निर्णय घेणे योग्य वाटत नाही. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सकांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे आणि तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे.

निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, पालकमंत्री, आरोग्य उपसंचालक, जिल्हाधिकारी, आमदार माणिकराव कोकाटे, तहसीलदारांसह सर्व राजकीय पक्षांच्या शहराध्यक्षांना पाठवण्यात आल्या आहेत. निवेदनावर अधि परिचारीका वैशाली बिंड, शितल रावल, ज्योती गावित, प्रयोगशाळा तंत्रज्ञ देवेंद्र सोनवणे, गौरव सोनवणे, क्ष किरण तंत्रज्ञ अनिल कासार, डाटा एन्ट्री ऑपरेटर संकल्प भालेराव, सफाई सेवक वसिम खतीब, मुकेश पारसकर, गणेश झुटे, राम लोंढे, निरिक्षक सचिन देशमुख, आकाश पाटील, सविता जाधव, तेजस वायचळे, मोबीन खतिब, कृष्णा देशमुख, ओमकार खिल्लारे, राहूल सुर्यवंशी, विशाल खडांगळे, केतन जाधव, संदिप लोंढे, गौरव पवार, गणेश राऊत, पंकज जगताप, मनुश्वेता पवार यांच्या सह्या आहेत.

आपल्याला आरोग्य खात्यातील 28 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सेवकांनी चुका केल्यास त्यांना आपण रागावतो. मात्र, त्या रागवण्यात आईची माया असते. कुणालाही त्रास देणे हा उद्देश कधीही नसतो. आताही नव्हता. उलट त्यांना समजावून सांगत रुग्णालयातून चांगल्यात चांगली सेवा देण्यासाठी मी तत्पर असते. एका नगरसेवकाच्या आईचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची घरी जाऊन तपासणी करण्यास सेवकांना सांगितले होते. त्यात गैर काही नव्हते. कुटुंबातील एवढ्या सदस्यांना रुग्णालयात बोलवण्यापेक्षा तो मार्ग चांगला वाटला म्हणून निर्णय घेतला होता.

डॉ. वर्षा लहाडे, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com