आरोग्य केंद्राच्या समस्यांबाबत निवेदन

आरोग्य केंद्राच्या समस्यांबाबत निवेदन

ठाणगाव । वार्ताहर Thangaon

ठाणगाव विकास मंचने Thangaon Vikas Manch येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास primary health center भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी येथे असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी मंचकडून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार Union Minister of State for Health Bharti Pawar यांची भेट घेऊन निवदेन दिले.

सध्या गावात सुरु असलेल्या डेंग्यू परिस्थितीची मंचकडून पाहणी केली असता प्राथमिक आरोग्य केंद्रात डेंग्ंयू नियंत्रण ठेवण्यासाठी डेंग्यू टेस्ट व इतर टेस्ट सुविधा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. याच पाश्वभुमिवर मंचच्या वतीने केंद्रीय मंत्री ना. पवार यांना निवेदन दिले.

सदर निवेदनाची दखल घेत त्यांनी जिल्हा वैद्यकिय अधिकार्‍यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून सदर समस्या दूर केली. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात तत्काळ सर्व सुविधा सुरु झाल्याचे ठाणगाव विकास मंचच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी मंचचे सदस्य यज्ञेश काळे, प्रतिक शिंदे, प्रमोद शिंदे, जयराम शिंदे , पांडुरंग भोर, अमित शिंदे, प्रशांत काकड उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com