आ. मौलाना मुफ्ती यांचा प्रशासनावर वचक नाही

आ. मौलाना मुफ्ती यांचा प्रशासनावर वचक नाही

मालेगाव | प्रतिनिधी | Malegoan

शहराचा विकास खुंटला असला तरी गुन्हेगारी (Crime) मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आ. मौलाना मुफ्ती (Maulana Mufti) यांचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही. सामान्य जनतेची कामे रखडवली जात आहे, खून, हल्ले, लुटमार, चोरी नशेचे पदार्थ विक्री सर्रासपणे सुरू आहे...

अवैध धंद्यांनी कळस गाठलेला आहे. आमदारांच्या दबावावरून वरिष्ठ पोलिस अधिकारी फिर्यादीलाच दम देतात, त्यामुळे गुन्हेगारांचे फावले आहे. या विरोधात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांची भेट घेऊन निवेदन देणार, अशी माहिती काँग्रेसचे माजी आ. शेख रशीद (Sheikh Rashid) यांनी दिली.

मीडिया सेंटर येथे आयाजित पत्रकार परिषदेत माजी आ. रशीद बोलत होते. ते म्हणाले की, शुल्लक कारणावर जिल्हा पोलिस प्रमुखांना भेटून मौलाना मुफ्ती भेटून दबाव टाकतात. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी गुन्हेगारांना सोडून तक्रारदाराच दमबाजी करताना पोलिसांनी शहरातील वाढती गुन्हेगारी थांबवली नसल्याने कंम्पाउंटवाली वसूली गँग शहरात दहशत निर्माण करीत आहे.

अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधीक्षक लत्ता दोंदे हे अधिकारी गुन्हेगारी निर्मुलनासाठी शहरात चांगली काम करीत आहे. मात्र वरिष्ठ पोलिस अधिकारी दबावातून फिर्यादीलाच धाक दाखवतात. यामुळे गुन्हेगारांचे फावत आहे.

शहरातील हारूण अन्सारी, आयेशा हकीम, हाजी शब्बीर अहमद आदी नेत्यांसह आपल्या आणि आसिफ शेख यांच्या कार्यकाळात झालेले विकासकामे आजही जनतेच्या नजरेत भरतात.

मात्र निहाल अहमद, आ. मौलाना मुफ्ती यांच्या सात वर्षाच्या कालखंडात एकही ठेर काम शहरवाशियांसाठी झाल्याचे दिसून येत नाही. आपल्या कार्यकाळात झालेल्या कामांचे श्रेय लाटण्यामध्ये मौलाना मुफ्ती धन्यता मानत आहे. चार हजार निराधारांस पेन्शन योजनेचा लाभ आ. दादा भुसे (Dada Bhuse) मिळवून देतात.

मौलाना फक्त 100 निराधारांना लाभ मिळपून देतात. यातूनच मौलाना मुफ्ती यांचे कतृत्व सिद्ध होते. पोलीस, महसूल, पुरवठा, आदी विभागावर मौलाना यांचा वचवक राहिलेला नाही. सामान्य जनतेचा मात्र कोणी वाली राहिलेला नाही.

शासन दरबारी विकासकामांसाठी पाठपुरावा केला जात नसल्याने शहरात विकासकामे रखडली आहे, असल्याचे शख रशीद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी गटनेते असलम अन्सारी, जाकीर शेख आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com