मुसळगाव। वार्ताहर sinnar / Musalgaon

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सिन्नर शाखेच्यावतीने ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात तहसिलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

ग्रामपंचायत निवडणूक आदेश देतांना महिला कर्मचारी,अपंग कर्मचारी, दुर्धर आजार असलेले कर्मचारी, 50 वर्षे वयाच्यावरील कर्मचारी, बालसंगोपन रजा घेतलेले कर्मचारी यांना निवडणूक आदेश देवू नयेत. तसेच करोना आजारावर उपचार घेत असलेले, विलगिकरणात असलेले आदिसह अडचणीत असलेल्या कर्मचार्यांना निवडणूक आदेश देऊ नयेत यासह विविध मागण्यात निवेदनात करण्यात आल्या होत्या.

यावेळी निवडणुकीबाबत, प्रशिक्षणाबाबत चर्चा करुन सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल. कोणत्याही शिक्षकांवर अन्याय देणार नाही असे आश्वासन तहसिलदार राहुल कोताडे यांनी दिले. निवेदनावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिन्नरचे अध्यक्ष अशोक कासार, सरचिटणीस सुकदेव वाघ, कार्याध्यक्ष शिवाजी जाधव, कोषाध्यक्ष धारासिंग राठोड आदिंसह सभासद, पदाधिकारी उपस्थित होते.