प्राथमिक शिक्षक संघटनेचे ग्रामविकासमंत्र्यांना निवेदन

प्राथमिक शिक्षक संघटनेचे ग्रामविकासमंत्र्यांना निवेदन

निफाड । प्रतिनिधी Niphad

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष (Attention to teachers' pending issues ) वेधण्याबरोबरच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश देऊन शिक्षक बदली धोरणात लवकर कार्यवाही करावी या मागणीसाठी प्राथमिक शिक्षक संघटना ( Primary Teachers Association ) पदाधिकार्‍यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif )यांची भेट घेत प्रश्न सोडवण्याची मागणी केली.

प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य निमंत्रक काळूजी बोरसे, राज्य समन्वयक मधुकर काठोळे, शिक्षक समिती राज्य अध्यक्ष उदय शिंदे, शिक्षक संघ राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे, राष्ट्रवादी शिक्षक संघटना अध्यक्ष संजय जाधव, अखिल दोंदे संघटना अध्यक्ष देवीदास बसवदे, समिती राज्य प्रवक्ते आबा शिंपी, आनंदा कांदळकर आदींनी मंत्रालयात हसन मुश्रीफ यांची भेट घेत त्यांना शिक्षक समस्यांचे निवेदन दिले.

यावेळी झालेल्या चर्चेत शिक्षक पदाधिकार्‍यांनी शिक्षकांच्या समस्या ग्रामविकासमंत्र्यांकडे मांडल्या. यात प्रामुख्याने विद्यार्थी उपस्थितीची सर्व सुविधा पुरवून शाळा सुरू करण्यात यावी, शिक्षक बदलीच्या धोरणावर कार्यवाही व्हावी, विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश पुरवावे, जुनी पेन्शन योजनेवर निर्णय घ्यावा, आंतरजिल्हा बदली धोरणात सुधारणा करावी, केंद्रप्रमुख पदे भरण्यात यावी, बदली कार्यवाही करण्यापूर्वी शुद्धीपत्रक काढण्यात यावे, अशी आग्रही मागणी शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com