पोलीस पाटील संघटनेचे निवेदन

पोलीस पाटील संघटनेचे निवेदन

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

नाशिक जिल्ह्यातील पोलीस पाटील कोरोना महामारीच्या संकटात अतिशय प्रामाणिकपणे काम करीत आहेत.

कोरोना संक्रमनाने शहीद झालेल्या नाशिक जिल्ह्यातील चेहडी, तालुका निफाड येथील स्वर्गीय रुमने पाटील यांच्या वारसांना तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील यांना पन्नास लाख रुपये विमा संरक्षण मिळावे.

नाशिक शहरात पोलिसांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये जिल्ह्यातील कोरोना बाधित पोलीस पाटील यांना उपचार मिळावा या महत्वाच्या मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटना नाशिक जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष चिंतामण पाटील-मोरे यांचे नेतृत्वात नवनियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

याबाबत निवेदनाची त्वरीत दखल घेत दिघावकर यांनी शासन स्तरावर स्वर्गीय रुमने पाटील व सर्व पोलीस पाटील यांच्या विम्याबाबत फॅक्सद्वारे शासनास माहिती दिली आहे. पोलीस पाटील हे प्रामाणिक काम करत असून सहानुभूती पूर्वक विचार करत नाशिक शहराचे पोलीस आयुक्त यांचेशी बोलून कोविड सेंटर बाबत लगेच निर्णय घेऊ असे त्यांनी यावेळी सांगितले.

संघटनेच्या पत्राची त्वरीत दखल घेतल्याने आपल्या मागण्या लवकरच मार्गी लागतील अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष यांनी व्यक्त केली. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष चिंतामण पाटील-मोरे, कार्याध्यक्ष अशोक सांगळे, जिल्हा उपाध्यक्ष संपत जाधव, नवनाथ पाटील आदी सहभागी झाले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com