कांदा व्यापाऱ्यांचे पालकमंत्री भुजबळ यांना निवेदन

कांदा व्यापाऱ्यांचे पालकमंत्री भुजबळ यांना निवेदन

लासलगाव । वार्ताहर Lasalgaon

कांदा खरेदीदारांनी ( Onion Traders ) गोडाऊन येथून कंटेनर द्वारे निर्यातीसाठी माल पाठविणे सुरु केल्याने नासिक जिल्ह्यातील ट्रक वाहक-मालक संघटनेने ( Truck carrier-owner association ) याला विरोध दर्शविला आहे.

कंटेनर चालक आणि मालकांना दमबाजी करत नाशिक जिल्ह्यात कांद्यासाठी कंटेनर न पाठवण्याचे फर्मान काढल्याने कांदा व्यापाऱ्यांनी( Onion Traders ) लासलगाव दौऱ्यावर आलेले राज्याचे अन्न नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ ( Guardian Minister Bhujbal ) यांना निवेदन देऊन लक्ष देण्याची विनंती केली.

व्यापाऱ्यांच्या गोडाऊनवर मोठ्या प्रमाणात कांदा पडून असल्याने कांद्याची निर्यात कशी करावी असा प्रश्न उभा राहिला आहे ट्रकमधून कांदा पाठविल्यास कांद्याचे मोठे नुकसान होत असल्याने कंटेनर हे वेळेत उपलब्ध व्हावे व कुठलाही अडथळा येऊ नये असे भुजबळांना दिलेल्या निवेदनात मागणी करण्यात आल्याचे लासलगाव व्यापारी अध्यक्ष नंदकुमार डागा यांनी सांगितले

यावेळी व्यापारी असोसिएशनचे ,ओमप्रकाश राका, मनोज जैन ,अफझल शेख ,पुरुषोत्तम चोथानी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com