
नाशिक । प्रतिनिधी
नाशिक जिल्हा सैनिक एकता संघटनेतर्फे (Nashik District Sainik Ekta Sangathan) विविध मागण्यांचे निवेदन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) व खा. हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना देण्यात आले...
रविवारी (दि.३०) जिल्ह्यातील माजी सैनिक संघटना पदाधिकारी तसेच विरनारी, विरमाता- पिता, दिव्यांग सैनिक तसेच समस्त माजी सैनिक व सैनिक परीवार यांनी पेन्शन, मिलट्री सर्वीस पे,इतर भत्ते सैनींकांचा हक्क मारून अधिकार्यानी स्वतःचा फायदा करून घेतला, जेसीओ व सैनिक यांच्यात केलेला भेदभाव हा दुर व्हावा. तो विषय संसदेत सविस्तरपणे मांडला जावा. तसेच २० फेब्रुवारीपासून जंतरमंतर दिल्ली येथे सर्व भारतातील सैनिक धरणे आंदोलन करत आहे.याबाबतचे निवेदन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, खा. गोडसे यांना देण्यात आले.
दरम्यान, यावेळी भारतीय माजी सैनिक संघटना सहसचिव फुलचंद पाटील, जिल्हाध्यक्ष विजय पवार, सैनिक कल्याण सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नवनाथ पगार, कार्याध्यक्ष संजय खैरनार,विरनारी विरमाता-पिता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रेखा खैरनार, भारतीय प्रहार माजी सैनिक संघ जिल्हाध्यक्ष विजय कातोरे, सैनिक फेडरेशन जिल्हाध्यक्ष दिनकर पवार, शासकीय पुर्ननियुक्त संघटना जिल्हाध्यक्ष सुनील पवार, माजी सैनिक आघाडी शहराध्यक्ष लक्ष्मीकांत पारनेरकर, रविंद्र शार्दुल,भास्कर पवार ,शांताराम रोडे, ज्ञानेश्वर पगार व इतर माजी सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.