समस्यांबाबत नगरसेवकांचे आयुक्तांना निवेदन

समस्यांबाबत नगरसेवकांचे आयुक्तांना निवेदन

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

जुने बिटको रूग्णालयाचे Old Bytco Hospital स्थलांतर नविन बिटकोमध्ये म्हणजेच हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रूग्णालय या इमारतीत करावे, बिटको पॉईंन्ट ते संत जनार्दन स्वामी पुल, दसकपर्यंतचा रस्ता नव्याने डांबरीकरण करावा, नाशिकरोड येथील राजमाता जिजाऊ तरणतलाव जलतरणपटू व आजीव सभासदांसाठी खुला करावा आदी मागण्या नाशिकरोडच्या नगरसेवकांनी Nashikroad Corporators केल्या आहेत. प्रभाग सभापती प्रशांत दिवे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्तांना NMC Commissioner याबाबत निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, बिटको ते जेल रोड हा रस्ता गॅस पाईपलाईनसाठी खोदल्यामुळे खराब झाला आहे. या रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर अपघात होत आहेत. रस्ता धोकादायक झाला आहे. त्यामुळे हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा.

नवीन बिटको रूग्णालयात करोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे या रुग्णालयातील बहुतांश खाटा रिकाम्या आहेत. जुने बिटको रुग्णालयात साथीच्या आजारांचे रुग्ण वाढल्यामुळे तेथे जागा नाही. त्यामुळे जुन्या बिटको रुग्णालयातील रुग्णांना न्याय देण्यासाठी व योग्य उपचार मिळण्यासाठी नवीन बिटको रुग्णालयात त्यांना स्थलांतरित करावे.

करोना रुग्णालय हे जुन्या बिटको इमारतीत स्थलांतरित करावे. करोना संकटामुळे नाशिकरोड आणि शहरातील तरणतलाव बंद करण्यात आले आहेत. मात्र आता करोना संख्या कमी होत असल्यामुळे येथील राजमाता जिजाऊ तरणतलाव तसेच शहरातील इतर तरणतलाव सुरू करावे, असे निवेदनात नमूद केले आहे. यावेळी नगरसेवक जगदीश पवार, दिनकर आढाव, रमेश धोंगडे, मंगला आढाव, सूर्यकांत लवटे, जयश्री खर्जुल, सुनील गोडसे, रोशन आढाव आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com