Video : स्वबळावर लढण्याची तयारी पण...

Video : स्वबळावर लढण्याची तयारी पण...

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महानगरपालिका निवडणुकीसाठी (Nashik NMC Election) भाजपाची (Bharatiya Janata Party) स्वबळावर लढण्याची तयारी आहे. पण कोणी समविचारांचे पक्ष एकत्र येणास तयार असतील तर युतीचा विचार केला जाईल, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP state president MLA Chandrakant Patil ) यांनी नाशिक (nashik) येथे केले...

चंद्रकांत पाटील कालपासून नाशिक दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजपाची महानगर पालिका निवडणुकीसाठी स्वबळावर लढण्याची तयारी सुरु झाली आहे. परंतु इतर समान विचारांचे पक्षांनी जर एकत्र यायची तयारी दर्शवली तर नक्कीच याचा विचार केला जाईल.

इंधन दरवाढीवर बोलताना ते म्हणाले की, राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स कमी करावा. असे केल्यास मी स्वतः केंद्राशी बोलून टॅक्स कमी करण्याचा प्रयत्न करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com