...तर कारवाईचे निर्णय घ्यावे लागतील; बाळासाहेब थोरात

मंत्री बाळासाहेब थोरात
मंत्री बाळासाहेब थोरात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

एसटीच्या संपकरी कामगार (ST Workers Strike) बांधवांनी समजून घेतले पाहिजे. किती ताणायचे हे ठरवावे. भाजपचे (BJP) सरकार असतानाही एसटी विलिनीकरणाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेले नव्हता. एसटी कर्मचाऱ्यांना सरकारच्यावतीने जेवढे चांगले आहे. तेवढे दिले आहे. सरकार सामावून घेऊच शकत नाही, एसटीच्या कामगार बांधवांनी समजून घ्यावे, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केले...

बाळासाहेब थोरात नाशिक दौर्यावर (Nashik Tour) आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, एसटीच्या संपकरी कामगारांनी आता थांबावे. संप संपुष्टात आणून कामावर रुजू व्हावे. जर आता त्यांनी ऐकले नाही, तर कारवाईचे निर्णय घ्यावे लागतील, असा इशाराच बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. आतापर्यंत हजारो कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. संपामुळे एसटी कर्मचाऱ्यांचेदेखील नुकसान होत आहे. सदावर्ते यांचे काहीच नुकसान होत नाहीये, अशी टीका अनिल परब (Anil Parab) यांनी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com