वीजपुरवठ्याच्या समस्यांप्रश्नी आंदोलनाचा इशारा

वीजपुरवठ्याच्या समस्यांप्रश्नी आंदोलनाचा इशारा

निफाड । प्रतिनिधी Niphad

नाशिक( Nashik ) येथील वीजवितरण ( Mahavitaran ) कंपनीचे मुख्य अभियंता कुमठेकर यांच्या कार्यालयात माजी आमदार अनिल कदम ( Former MLA Anil Kadam )यांनी धडक देत निफाड तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या विजेच्या समस्या मांडल्या. त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन अभियंता कुमठेकर यांनी दिले.

तालुक्यात सर्वत्र विजेच्या समस्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. अनेक ठिकाणी थकीत वीजबिल अभावी वीज कनेक्शन कट केले जात आहे. तसेच ज्या लोकांनी 80 टक्के वीज बिलांचा भरणा केला आहे त्यांचे देखील वीज कनेक्शन कट केले जात आहे.

वारंवार जंप तुटणे, ट्रान्सफार्मर फेल होणे, ट्रान्सफार्मरची कॉयल जाणे, तार तुटणे आदी वीज समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच नागरिकांनी अर्ज करूनही फिडर बदलून मिळत नाही. तसेच महावितरण विभागाकडून चालू असलेल्या सक्तीच्या वीज बिल वसुलीला वाढीव मुदत मिळावी या करिता माजी आमदार अनिल कदम यांनी मुख्य अभियंता कुमठेकर यांच्याकडे मागणी केली. याबाबत लवकर कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला.

यावेळी कुमठेकर म्हणाले की, सक्तीच्या वसुलीसंदर्भात ऊर्जा विभागाचे स्पष्ट निर्देश असून थकबाकीत प्रचंड वाढ झाल्याने वीजवितरण कंपनी तोट्यात आली आहे. त्यामुळे पर्यायाने वसुली करावी लागत असून शेतकर्‍यांनी व स्ट्रीटलाईट बाबत ग्रामपंचायतींनी किमान चालू बिले भरून सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.

याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर कराड, गोकुळ गिते, शंकर संगमनेरे, संजय दाते, तानाजी पूरकर, बाबाजी कुशारे, योगेश कुयटे, अमोल जाधव, देवेंद्र काजळे, पोपट पाटील, अरूण डांगळे, छोटू साळे, प्रकाश वाटपाडे, किरण सानप, दशरथ रुमणे, भाऊसाहेब कमानकर, भाऊसाहेब खालकर, शरद खालकर, सरपंच भगवान चव्हाण, शांताराम कुरणे, समाधान खेलूकर आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com