देवळा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; प्रहार शेतकरी संघटनेतर्फे तहसीलदारांना निवेदन

देवळा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; प्रहार शेतकरी संघटनेतर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंगरगाव | वार्ताहर | Dongargaon

पावसाळ्यास (Rainy Season) प्रारंभ होवून दोन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी अद्याप तालुक्यात दमदार पाऊस (Rain) झालेला नाही. यामुळे खरीप हंगामातील पिके (Crops) धोक्यात येवून शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले असल्याने देवळा तालुका शासनाने दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

देवळा (Deola) येथे प्रहार शेतकरी संघटनेच्या (Prahar Farmers Association) पदाधिकार्‍यांनी नायब तहसीलदार अहिरराव यांना तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. या निवेदनात तालुक्यात अद्याप दमदार पाऊस पडलेला नसल्याने खरीप हंगाम धोक्यात आला असून अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे.

दरवर्षापेक्षा यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने पिकांच्या नुकसानीचे (Damage) प्रमाण वाढल्याने दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तालुक्यात विहीरी व धरणे देखिल कोरडी झाली आहेत. ही भिषण परिस्थिती लक्षात घेता शासनाने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, उमराणे गट प्रमुख आकाश थोरात, दहीवड गणप्रमुख स्वप्निल पगार, विकी निकम, अजय जाधव, रूपंश निकम, वैभव आहेर, रोहित जाधव, यश पगार, ओम भामरे, योगेश निकम, सोनु भदाणे, सार्थक निकम आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com