औद्योगिक वसाहतीसाठी उद्योग मंत्र्यांना साकडे

सटाणा नगराध्यक्ष सुनील मोरे
औद्योगिक वसाहतीसाठी उद्योग मंत्र्यांना साकडे

सटाणा । प्रतिनिधी Satana

बागलाण तालुक्यात औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासंदर्भात (Regarding creation of industrial estate in Baglan taluka ) मंत्रालयात स्वतंत्र बैठक बोलवण्यात यावी, अशी मागणी उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे (Minister of State for Industry- Aditi Tatkare )यांच्याकडे करण्यात आली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे ( Sunil More- Satana Town Council ) यांनी दिली.

तालुक्यात रोजगारनिर्मिती करण्यासाठी औद्योगिक वसाहत निर्माण करणे काळाची गरज असून परिसरातील शेकडो बेरोजगार युवकांची खूप वर्षांपासून औद्योगिक वसाहतीची मागणी आहे. यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून उद्योगमंत्री सुभाष देसाई व राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे आपण मागणी केली होती.

त्यानुसार नाशिक येथील औद्योगिक विकास महामंडळाचे ( MIDC ) प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांच्या सूचनेनुसार मुख्य सर्वेक्षण अधिकारी राजाराम बहिरम यांनी सर्वेक्षण करून त्यात अजमेर सौंदाणे व ठेंगोडा येथील तसेच तालुक्यातील इतर गावातील सरकारी जमिनीची पाहणी करून औद्योगिक विकास महामंडळाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात स्थळ पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष मोरे यांनी दिली.

कृषी क्षेत्रात प्रयोगशील म्हणून नावलौकिक असलेल्या बागलाण तालुक्यात कांदा, डाळिंब, द्राक्ष, मका, भाजीपाल्याची पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. या धर्तीवर तालुक्यात कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योग औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून सुरू केले तर उद्योग व रोजगारवाढीस चालना मिळणार आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याने बेरोजगार तरुणांना मोठी संधी या औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकणार आहे.

तालुक्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेतलेल्या व आजूबाजूच्या हजारो विद्यार्थ्यांसाठी सटाणा शहरापासून नाशिक, मुंबई, पुणे, सुरत या मोठ्या औद्योगिक वसाहतींना लागणारा पूरक व कच्चा माल तयार करून पाठवता येणार असल्याचे मत नगराध्यक्ष मोरे यांनी व्यक्त केले. यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाकळे, वैभव गांगुर्डे, दत्तू बैताडे, धनंजय पवार आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.