सिन्नरला ऑक्सिजनचा तुटवडा; तहसीलदारांना निवेदन

सिन्नरला ऑक्सिजनचा तुटवडा; तहसीलदारांना निवेदन

सिन्नर । प्रतिनिधी

शहरातील खासगी कोविड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात करोना रुग्ण दाखल असून सर्व पेशंटला ऑक्सिजन आवश्यता आहे. मात्र ऑक्सिजन पुरवठादारांकडून तांत्रिक कारण देत ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सिन्नर तालुक्यात ऑक्सिजन तुटवड्याची शक्यता असून एकतर ऑक्सिजनची व्यवस्था करा अन्यथा रुग्णांची दुसरीकडे व्यवस्था करा अशी मागणी सिन्नर तालुका वैद्यकीय सेवाभावी संघटनेच्या वतीने तहसिलदार राहुल कोताडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्रात आलेली कारोनाची दुसरी लाट चिंताजनक परिस्थिती निर्माण करत आहे. जिल्ह्याच्या आकडेवारीत सिन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आहेत. तालुक्यात यापुर्वीच रेमडिसिव्हर या औषधाचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असून तालुक्यात जास्त रुग्ण असतांनाही प्रशासनाकडून मात्र इतर तालुक्यांच्या तुलनेत सिन्नरला अत्यंत कमी प्रमाणात या औषधाचा पुरवठा करण्यात येत आहे.

मात्र तरी देखील तालुक्यात आतापर्यंत बेड मिळणे, ऑक्सिजन तसेच इतर औषधे यांबाबत स्थिती नियंत्रणात होती. मात्र शनिवारी (दि.24) काही तांत्रिक कारणास्तव पुरवठादारांकडून ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला आहे. तालुक्यातील खासगी कोविड सेंटरमधील सर्व रुग्ण हे सद्या ऑक्सिजनवर आहे. त्यामुळे पशिच परिस्थिती राहीली तर तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊन रुग्णांच्या जिवावर बेतण्याची शक्यता असल्याचे डॉक्टर सेलकडून निवेदनात म्हटले आहे.

तहसिलदारांनी आपल्या स्तरावर तत्काळ रेमडिसिवर आणि ऑक्सिजन पुरवठ्याबाबत नियोजन करावे अन्यथा रुग्णांची इतरत्र व्यवस्था करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com