वलखेड | वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथील सरपंच विनायक शिंदे, उपसरपंच सुमनबाई पाटील व ग्रामपंचायत सदस्य यांनी आमदार नरहरी झिरवाळ यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.

येथे विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवाळ साहेब यांचीभेट घेऊन वलखेड ग्रामपंचायत सरपंच विनायक शिंदे व उपसरपंच सुमनबाई पाटील प्रकाश शिंदे, सदस्य हिरामण पाटील, कमल चारोस्कर, रामदास चारोस्कर, आश्विनी शिंदे, सुनीता राऊत, मंगला राजगुरु, आदींनी भेट घेऊन प्रथम आमदार झिरवाळ साहेबांचा सत्कार केला व ज्येष्ठ नेते प्रकाश शिंदे व सरपंच विनायक शिंदे यांनी नवीन कामांची मागणी करून गावातील समस्या मांडल्या व कामांना मंजुरी देण्याची मागणी केली आमदार झिरवाळ यांनी सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करू व कामांना निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन यावेळी सर्वांना दिले.

याप्रसंगी प्रकाश शिंदे सरपंच विनायक शिंदे उपसरपंच सुमन पाटील सर्व सदस्य,प्रकाश शिंदे, पी.एस. पाटील, बाळासाहेब पाटील, केशव मेधने,बाजीराव शिंदे, अनंत पाटील, पोपट कडाळे, कचरू पाटील, आनंदा राजगुरू, यादव चारोस्कर, गणेश पाटील, सुजित पाटील, रमेश पाटील, नवनाथ पाटील, धनंजय राऊत, योगेश शिंदे, तौशिफ मणियार, गणेश शिंदे आदी ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते यावेळी सर्व ग्रामस्थांनी आमदार झिरवाळ यांचे आभार मानले.