शिवसेनेकडून मनपा आयुक्तांना निवेदन

शिवसेनेकडून मनपा आयुक्तांना निवेदन

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी 23 जूनला प्रसिध्द झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये ( Voters List ) अनेक त्रुटी असल्याने प्रभाग हद्दीनुसार त्या नसल्याने त्यात मोठ्याप्रमाणात तफावत आढळत आहेत. याबाबत आक्षेप नोंदविण्याची मुदत 15 दिवसांनी वाढवून मिळावी (Extension of deadline for filing objections)या आशयाचे निवेदन शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मनपा आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार ( NMC Commissioner Ramesh Pawar )यांना दिले.

यावेळी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे कि,प्रभागाच्या हद्दीनुसार मतदार याद्या होणे अपेक्षित होते.मात्र प्रभागाच्या चतुसिमा महापालिकेने ठरवून दिलेल्या हद्दीनुसार झाल्या असल्यातरी बरेचसे मतदार प्रभागाच्याबाहेर गेल्याचे दिसत आहे.दुसऱ्या प्रभागतील नावे त्या प्रभागात समाविष्ट झाल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.विधानसभेच्या याद्यांनुसारच मतदारांची नांवे येणे अपेक्षित होते.

मात्र तसे झाले नाही.महापालिकेने प्रभाग रचनेनुसार केलेले जनगणनेचे ब्लॉक आपल्याकडे उपलब्ध असतांनाही प्रभागनिहाय मतदारयाद्यांमध्ये मोठयप्रमाणात चुका झाल्याचे आश्चर्य वाटते. त्याच्या दुरुस्तीसाठी तसेच हरकती नोंदविण्यास दिलेला कालावधी खूपच कमी आहे.

सर्व 44 प्रभागातून या सदोष प्रारूप मतदार याद्यांबाबत प्रचंड नाराजीचा सूर असल्याने त्यांना आक्षेप नोंदविण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा यासाठी ही मुदत आणखी 15 दिवसांची वाढवून मिळावी अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते,माजी गटनेते विलास शिंदे,मध्य नाशिक विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे,पश्चिम नाशिक विधानसभाप्रमुख सुभाष गायधनी,उप महानगरप्रमुख नाना पाटील,उप विभागप्रमुख संदीप लभडे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com