NCP's woman
NCP's woman|राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे पोलिस आयुक्तांना निवेदन
नाशिक

राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे पोलिस आयुक्तांना निवेदन

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक । Nashik प्रतिनिधी

सातपूर येथील महिलेला रस्त्यावर अमानुष मारहाण करण्यात आली. दोषींवर कडक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन पोलीस आयुक्त नाशिक शहर विश्वास नांगरे पाटील यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्षा अनिता भामरे यांनी महिला पदाधिकारींच्या उपस्थितीत दिले.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी रंजना चव्हाण यांना त्यांच्याच नातेवाईकांनी घरगुती वादातून भर रस्त्यावर सातपूर येथे अमानुष मारहाण केली. ही घटना वाॅर्डातील अनेक नागरिकां समक्ष घडली.

या मारहाणीचा व्हिडिओ देखील सोशल मिडीयात प्रसिद्ध झाला. या घटनेस महिना होऊनही दोषींवर कारवाई होत नाही, म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्षा अनिता भामरे यांनी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याशी चर्चा करून रंजना चव्हाण यांना न्याय मिळावा, अशी विनंती केली.

आयुक्तांनी लागलीच सातपूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे यांना तत्काळ कारवाई करावी, अशी सूचना केली. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना निवेदन देतांना राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्षा अनिता भामरे, पश्चिम विधानसभा अध्यक्ष पुष्पलता राठोड, संघटक स्वाती बिडला, रंजना चव्हाण, रिना चव्हाण उपस्थित होत्या.

Deshdoot
www.deshdoot.com