नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :

नवीन नाशकातील काही भागात मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याने भाजप तर्फे विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात असे नमूद केले आहेर की, नवीन नाशकातील बऱ्याच चौकात साफसफाई होत नसल्याने कचरा मोठ्या प्रमाणात साचलेल्या अवस्थेत आहे. पावसाळी नाले साफसफाई होत नसल्याने नाल्यांमध्ये घाणीचे साम्राज्य वाढल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.

अनेक भागांमध्ये रात्रीच्या वेळेस पथदिप नसल्याने व असलेले पथदिप काही ठिकाणी बंद असल्याने अशा भागात अंधाराचा फायदा घेऊन चोरीच्या घटना वाढलेल्या आहे, काहि भागात ड्रेनेज लाईन ब्लॅक झाल्याने काही चेम्बर्स मधुन घाण पाणी लोकांच्या घरात तसेच रस्त्यावर वाहत राहते.

यामुळे अशा भागात लोकांना छोट्या मोठ्या आजारालाही सामोरे जावे लागते. या सर्व समस्यांवर मनपा प्रशासनाने त्वरीत उपाययोजना कराव्या या करता शिवाजी बरके यांनी विभागीय अधिकारी यांची भेट घेऊन सर्व समस्यांचा पाढा वाचून लेखी निवेदन देऊन हि काम लवकरात लवकर झाली नाही तर मनपा कार्यालयच आंदोलन करण्याचा इशारा बरके यांनी दिला.

यावेळी विनोद भडांगे, वसंत भालेराव, गणेश बर्गे, गिरीश पाटील, सचिन पवार, आदी नागरिक उपस्थित होते