युवासेनेच्या पदाधिकार्‍यांचे राज्यव्यापी अधिवेशन - वरुण सरदेसाई

युवासेनेच्या पदाधिकार्‍यांचे राज्यव्यापी अधिवेशन - वरुण सरदेसाई

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राज्यातील आगामी महानगरपालिका Upcoming NMC Elections , जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या Zilla Parishad & Panchayat Samities Elections पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्याला विशेष महत्व असून यावेळी या निवडणुकांचा बिगुलही वाजण्याची शक्यता आहे.

दरम्यान युवासेनेच्या Yuvasena पदाधिकार्‍यांचे राज्यव्यापी अधिवेशन 8 व 9 जानेवारीरोजी नाशिकला होत असल्याने अधिवेशनाच्या तयारीबाबत युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई Secretary of Yuvasena Varun Sardesai यांनी नाशिकला भेट देऊन अधिवेशन यशस्वी करण्याचे आवाहन केले.

युवासेनाप्रमुख तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे,परिवहनमंत्री अनिल परब, कृषीमंत्री दादा भुसे, गुलाबराव पाटील यांच्यासह डझनभर मंत्री, शिवसेनेची बुलंद तोफ खा.संजय राऊत आदी अधिवेशनास उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

युवासेनेच्या पदाधिकार्‍यांसाठी हे अधिवेशन एक पर्वणीच ठरणार आहे.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवासेनेच्या पदाधिकार्‍यांवर मोठी जबाबदारी राहणार आहे. त्यादृष्टीने ही फळी किती तत्पर आणि तयार आहे याची चाचपणीही दोन दिवसांच्या अधिवेशनात घेतली जाणार असल्याचे सूतोवाच वरुण सरदेसाई यांनी केला.

डॉ.एपीजे अब्दुल कलाम कन्व्हेन्शन सेंटर, नानाच्या मळ्याजवळ,पपय्या नर्सरी(सातपूर) येथे होणार्‍या या मेळाव्यास राज्याच्या कानाकोपर्‍यातून युवासेनेचे 2 हजार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशन स्थळाची पहाणी वरुण सरदेसाई यांनी केली. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्व शिवसैनिक कसोशीने प्रयत्न करतील असे आश्वासन शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर Sudhakar Badgujar- Shivsena यांनी यावेळी दिले.

शिवसेनेच्या शालिमार येथील कार्यालयात आयोजित बैठकीस संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी,शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर,युवासेना कोषाध्यक्ष व नगरसेवक अमेय घोले,सुप्रदा फातरपेकर, युवासेना विस्तारक सिध्देश शिंदे,अजिक्य चुंभळे, युवासेना जिल्हाधिकारी दीपक दातीर,राहुल ताजनपूरे आदींसह युवासेनेचे जिल्हा व महानगरातील पदाधिकारी उपस्थित होते. वरुण सरदेसाई यांनी नंतर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर महानगरातील कायदा व सुव्यवस्था तसेच इतर अन्य प्रश्नांवर चर्चा केली.

Related Stories

No stories found.