नाशिक । Nashik

पुरोगामी विचार मंच, नाशिक व दलित युवक आंदोलन नाशिक व धम्मगिरी सामाजिक व शैक्षणिक संस्था यांच्यावतीने राजस्तरीय सत्य शोधक पुरस्कार जाहीर झाले आहेत.

अण्णाभाऊ साठे जन्म शताब्दी वर्ष व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. परशुराम सायखेडकर सभागृह नाशिक येथे ३ जानेवारी रोजी हा सोहळा पार पडणार आहे.

जेष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांच्या शुभहस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. दरम्यान आज (दि.२३) रोजी संस्थेचे वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करीत पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये भाऊसाहेब सोनावणे, पुणे (सामाजिक कार्य), डॉ. मारुती कसाब उदगीर (कला व साहित्य), कॉ. महादेव खुडे, नाशिक (कामगार लढा), प्रा.प्रमिला पवार महिला, नाशिक (सक्षमीकरण), विशाल लोमटे ऑस्ट्रेलिया (विद्यार्थी संशोधन). यासोबतच धम्मागिरी राजस्तरीय निबंध स्पर्धेच्या विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली.

सदर पुरस्कार वितरण कार्यक्रमात सत्यशोधक दिनदर्शिका, विशेष गौरव पुरस्कार व १०० शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकार्यांनी दिली.