बेघर निवारा केंद्राच्या कामकाजाचा 'या' दिवशी राज्यस्तरीय आढावा

बेघर निवारा केंद्राच्या कामकाजाचा 'या' दिवशी राज्यस्तरीय आढावा

नाशिक |प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) कार्यक्षेत्रात ‘दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाची’ अंमलबजावणी करण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत ‘शहरी बेघरांना (homeless) निवारा’ हा एक महत्वाचा घटक आहे. शासन निर्णयानुसार उज्ज्वल उके (से.नि.भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय निवारा संनियंत्रण समिती गठीत करण्यात आलेली आहे. सदर समिती नाशिक विभागातील कामकाजाचा आढावा 04 फेब्रुवारी 2023 रोजी घेणार आहे.

महानगरपालिका आणि नाशिक विभागातील काही निवडक शहरांमध्ये बेघरांसाठी सुरु असलेल्या निवारा केंद्रातील नोडल अधिकारी (Nodal Officer), केंद्र चालविणाऱ्या संस्था यांचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच  पोलीस विभाग (Police Department), आरोग्य विभाग, निवारा व्यवस्थापन संस्था, सामाजिक संस्था आणि बेघर लाभार्थी यांच्याशी देखील बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

त्या अनुषंगाने नाशिक शहरातील (Nashik city) सर्व सामाजिक संस्थांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून बेघर नागरिक या दुर्लक्षित घटकासाठी काम करण्यासाठी पुढे यावे. राज्य संनियंत्रण समितीच्या बैठकीत चर्चेसाठी सहभागी व्हावे, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.

नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) कार्यक्षेत्रात सन 2019 च्या सर्वेक्षण नुसार एकूण 894 बेघर लाभार्थ्यांची नोंद करण्यात आलेली आहे. त्यापैकी १८० लाभार्थी क्षमता असलेले एक कायमस्वरूपी निवारा केंद्र कार्यन्वित आहे. तसेच उर्वरित बेघरांसाठी कायमस्वरूपी ४ नवीन निवारा केंद्र बांधकाम करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com