त्र्यंबक नगरीत रंगणार राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धा

त्र्यंबक नगरीत रंगणार राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धा
News Update | न्यूज अपडेटNews Update | न्यूज अपडेट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशन (Maharashtra penchak silat Association) आयोजित ११ व्या राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट (11th State Level penchak silat Competition) स्पर्धा २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान त्र्यंबकेश्‍वर (Trimbakeshwar) येथे आयोजित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती इंडियन पिंच्याक फेडरेशनचे अध्यक्ष तथा महा. पिंच्याक सिलॅट असोशिएशनच महासचिव किशोर येवले यांनी पत्रकार परिषदेत दिली...

त्र्यंबकेश्‍वर येथील ओम जगद्गुरू जनार्दन स्वामी, मौनगिरी महाराज आश्रमात होणाऱ्या पिंच्याक सिलॅट स्पर्धा सर्व वयोगटातील महिला आणि पुरुष खेळाडूंसाठी खुल्या आहेत. स्पर्धेत राज्यभरातील ३४ जिल्ह्यातील सुमारे ७०० खेळाडू यामध्ये सहभागी होणार असून पहिल्या दिवशी (दि.२२) १० ते १४ वयोगटातील २३० खेळाडू खेळणार आहेत. मंगळवारी (दि.२३) १४ ते १७ वयोगटातील २४० तर तिसऱ्या दिवशी (दि.२४) १७ ते ४५ वयोगटातील २३० खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती येवले यांनी दिली.

स्पर्धेचे उद्घाटन खा. हेमंत गोडसे, किशोर येवले व तृप्ती बनसोडे व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. बक्षीस वितरण २३ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता होईल तर अंतिम बक्षीस वितरण सभारंभ २४ नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजता होईल.

पत्रकार परिषदेला नाशिक पिंचाक सिलाट असोसिएशनचे अध्यक्ष सचिन गवई, उपाध्यक्ष डॉ. विशाल जाधव, सचिव नागेश बनसोडे, खजिनदार किर्ती गवई, डॉ. उज्ज्वला निकम, राम जगताप, इंडियन कोच निखिल साबळे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com