मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासन सकारात्मक

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासन सकारात्मक

खा. गोडसेनी घेतली सचिवांची भेट

देवळाली कॅम्प | Deolali Camp

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यच्या सामान्य प्रशासन विभागाचे वतीने सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती घेताना

सर्वप्रथम समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती देण्यासाठी शासनाचे तातडीने पावले उचलावीत अशी आग्रही मागणी खा.हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांनी केली.

मराठा समाजाचे आरक्षणासाठी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून नेमके काय पावले उचलली जात आहेत, याचा आढावा खा गोडसे यांनी मंत्रालयाच्या सामान्य प्रशासनाकडून (General Administration) आढावा घेतला.

यावेळी प्रशासनाचे सेक्रेटरी सुमंत भांगे (Secretary Sumant Bhange) यांच्याशी खा गोडसे यांनी चर्चा केली मराठा समाज सामाजिक मागास असल्याचे सिद्ध करण्यासाठी शासनाकडून विशेष उपाययोजना करण्याची गरज असून सर्वप्रथम मराठा सामाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती ( Free Education) मिळवून देणे गरजेचे आहे.

याशिवाय न्या. गायकवाड अहवालाच्या शिफारसी कोर्टाने मान्य केलेल्या नाहीत. मात्र त्यात काही अपुर्णता असल्याचे मत मांडले आहे, आरक्षण रद्द करतांना सुप्रिम कोर्टाने (Supreme Court) हे मत नोंदविले आहे. या बाबद गत आठवड्यात खा गोडसे यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री विजय वडेट्टीवार ( Minister Vijay Vadettiwar) यांचीही भेट घेतली होती.

यावेळी सुप्रीम कोर्टाने अहवालातील अपुर्ण बाबी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत, त्याबाबत राज्य शासनाने पुर्तता करुन सदरचा अहवाल राज्यपाल, राष्ट्रपती यांच्याकडून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे पाठविण्याची आग्रही मागणी केली होती. त्या पाठोपाठ आज खा. गोडसे यांनी मंत्रालयात सामान्य प्रशासनाचे राज्याचे सेक्रेटरी भांगे यांच्याकडून आरक्षण बाबत प्रशासनाकडून नेमक्या काय हालचाली सुरु आहेत.

या विषयीची माहिती जाणून घेतली असता गोखले समितीच्या अहवालानुसार नवीन आयोग स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडे पाठविला असून आरक्षणाच्या संभ्रमामुळे भरती प्रकियेत अडकलेल्या मराठा उमेदवारांना न्याय देण्यासाठी काय करता येईल जेणेकरुन कंटेम होणार नाही. यावर शासन प्रशासन मुख्य फोकस करीत असल्याचे भांगे यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाला दिलासा मिळावा म्हणून राजश्री छत्रपती शाहू महाराज शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना, ई.सी.बी.सी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देश-विदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये शिक्षणाची सुविधा या योजनांसह सारथी मार्फत दिल्या जाणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहितीचा लेखाजोखा यावेळी भांगे यांनी खा. गोडसे यांच्यासमोर मांडला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com