त्र्यंबकेश्वरजवळ राज्य उत्पादन शुल्कचा छापा
नाशिक

त्र्यंबकेश्वरजवळ राज्य उत्पादन शुल्कचा छापा

मद्याचे बॉक्स जप्त

Gokul Pawar

Gokul Pawar

वेळुंजे | Velunje

नाशिक तालुक्यातील गणेशगाव (त्र) या ठिकाणी अवैध मद्य विक्री करणाऱ्या दुकानावर छापा मारला आहे. यात मद्याचे बॉक्स आढळून आले आहे.

गणेशगाव(त्र्य) परिसरात सतत देशी मद्याची अवैध रित्या विक्री होते. यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था ही अबाधित न राहता पूर्ण कोलमडली जाते. यातूनच गावात वाद निर्माण होत असतात.

दरम्यान ग्रामस्थांनी एकत्र येत विक्रेत्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाला अर्ज केला होता. त्या अर्जाची दखल घेत (दि.२४) रोजी नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक ननवठे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशगाव (त्र) या ठिकाणी अचानक छाप मारला असता त्यांना या ठिकाणी देशी मद्याचे बेवारस अडीच बॉक्स मिळून आले.

यावेळी पोलिस पाटील दत्तू लिलके, सरपंच गणपत ठमके उपसरपंच संपत नामेडे ग्रामसेवक नरसाळे भाऊसाहेब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दत्तू ठमके यावेळी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com