सीमाभागातून होतेय चोरटी वाहतूक; राज्य उत्पादन शुल्कची मोठी कारवाई

सीमाभागातून होतेय चोरटी वाहतूक; राज्य उत्पादन शुल्कची मोठी कारवाई

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State excise department) वतीने त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) तालुक्यातील हरसुल (Harsul) येथील पो. चिंचओहोळ (Chinchohol) येथे सापळा रचत एका चार चाकी गाडीतून विदेशी मद्याच्या लाखो रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, होळी सणाच्या निमित्ताने चोरट्या मार्गाने अवैधरित्या परराज्यातील विदेशी दारू (illegal liquor sale and transport) ची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर विभागीय उपायुक्त नाशिक अर्जुन ओहोळ व जिल्हा अधिक्षक डॉ. मनोहर सुळे (Dr Manohar Sule) यांच्या मार्गदर्शनाखाली ( दि.13) दावलेश्वर हरसुलरोड लगत, कापडपाना, पो. चिंचओहोळ हरसुरल तालुका त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे सापळा रचून महिंद्रा कंपनीची स्कार्पियो ( एम एच १५ डीसी ५४५५ ) अडविली.

या वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये विदेशी बनावटीच्या हजारो बॉटल्स व बियरचे टिन आढळून आले.

याप्रकरणी, सर्व मुद्देमाल व गाडी असा ७ लाख ६२ हजार दोनशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व संशयित दादा रामू बुधवार ( 26,रा. काकडपाना,पोस्ट चिंचओहोळ हरसुल तालुका त्र्यंबकेश्वर त्याला अटक करण्यात आली.

ही कारवाई एस एस देशमुख, व्ही एस कौसडीकर, जीबी साबळे, जे एस जाखेरे, दुय्यम निरीक्षक पी बी ठाकूर, एम आर तेलंगे ,यशपाल पाटील, एस बी चव्हाण, के एच एस नेहरे, एम डी गरुड, व्ही ए चव्हाण, जी आर तारे, आर वाय मुंढे, के सी कदम, एस बी दिघोळे, राजेंद्र चव्हाणके, राहुल पवार,गोकुळ परदेशी,गोरख आहेर, वीरेंद्र वाघ, धनराज पवार, यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली याप्रकरणी पुढील तपास दुय्यम निरीक्षक पी बी ठाकूर (PB Thakur) करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com