राज्य तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेचा समारोप

रायगड, नाशिक, सातारा, सोलापूरच्या खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी
राज्य तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेचा समारोप

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी असोसिएशन Maharashtra State Fencing Association आणि नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन Nashik District Fencing Association यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नाशिकच्या के.एन.डी. मंडळ यांच्या सहकार्याने नाशिकच्या कालिका देवी मंदिर येथील हॉलमध्ये मिशन ऑलिम्पिकअंतर्गत चाईल्ड गटाच्या पहिल्या महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेची Maharashtra State Fencing Competition सांगता झाली.

या स्पर्धेत फॉईल प्रकारात मुलांमध्ये रायगडच्या खेळाडूंनी वर्चस्व राखत पहिले तीन क्रमांक आपल्या नावे केले. रायगडच्या विवेन शेट्टीने चांगली कामगिरी करून अंतिम लढतीत आपल्याच जिल्ह्याच्या ओजस पवार हिचा 8-5 असा पराभव करून विजेतेपद मिळवले. तर रायगडच्या आदित्य गौडा आणि विनय दुणा यांनी संयुक्त तिसरा क्रमांक मिळवला.

या प्रकारात मुलींमध्ये सातार्‍याच्या आर्या पोळने अंतिम लढतीत रायगडच्या क्रिश शहा हिला 9-4 अशा गुणांनी पराभूत करून विजेतेपद मिळवले. या प्रकारात नाशिकच्या संतुष्टी नलगे आणि रायगडच्या प्रिशा क्षेत्री यांना तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

सॅबर प्रकारात मुलांमध्ये नाशिकच्या आयुष गावलेने अंतिम लढतीत रायगडच्या अन्वर हुसेनला 9-6 असे पराभूत करून विजेतेपद मिळवले. तर मुलींमध्ये सातार्‍याच्या नूतन वरखेडेने प्रथम क्रमांक तर सोलापूरच्या समृद्धी घाले हिने दुसरा क्रमांक मिळवला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना सुवर्ण, रजत आणि कांस्यपदके आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

अंतिम निकाल :- सॅबर मुले : 1) आयुष्य गावले, नाशिक, प्रथम 2) अन्वर खान, रायगड, दुसरा क्रमांक. 3) विवेन शेट्टी, रायगड आणि वेदांत ढसाळ, सोलापूर

संयुक्त तिसरा क्रमांक. सॅबर मुली : 1) नूतन वरखेडे, सातारा, प्रथम, 2) समृद्धी घाले, सोलापूर, दुसरा क्रमांक. 3) प्रिशा क्षेत्री, रायगड आणि आद्या आहेर,

नाशिक - संयुक्त तिसरा क्रमांक. फॉईल मुले - 1) विवेन शेट्टी - प्रथम, 2) ओजस पवार - दुसरा क्रमांक, 3) आदित्य गौडा आणि विनय दिने - संयुक्त तिसरा क्रमांक, सर्व रायगड

फॉईल मुली - 1) आर्या पोळ, सातारा, प्रथम, 2) कैहा शहा, रायगड, दुसरा क्रमांक, 3) प्रिशा क्षेत्री, रायगड आणि संतुष्टी नलगे, नाशिक, संयुक्त तिसरा क्रमांक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com