दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदीजोड योजनेची कामे त्वरित सुरु करा

दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदीजोड योजनेची कामे त्वरित सुरु करा

ओझे | वार्ताहर | Oze

दमणगंगा-एकदरे-गोदावरी या नदीजोड योजनेची (Damanganga-Ekdare-Godavari river connection scheme) कामे लवकरात लवकर सुरु करावीत, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (State Assembly Deputy Speaker narhari zirwal) व जलसंपदामंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत...

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दमणगंगा-एकदरे-गोदावरी योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ यांनी योजनेसंदर्भात क्षेत्रीय स्तरावरील तांत्रिक बाबीबद्दल काही महत्त्वाच्या उपाययोजना सुचविल्या. ज्यामुळे या प्रकल्पाची किंमत कमी होऊ शकेल असे त्यांनी सांगितले.

त्यासंदर्भात विभागाने प्रशासकीय मान्यता व इतर बाबींकरीता प्रस्ताव त्वरीत सादर करावे, अशा सुचना जलसपंदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या. या प्रकल्पामुळे दुष्काळी भागातील पाणीप्रश्न काही प्रमाणात सुटून सिंचनात‍ वाढ होईल, असेही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले.

याबाबत सविस्तर अहवाल (डीपीआर) राष्ट्रीय जलविकास अभिकरण (NWDA) नवी दिल्ली यांच्यामार्फत तयार करण्यात येत असून हे काम प्रगतीपथावर आहे. सप्टेंबरअखेरीस अहवाल जलसंपदा विभागास सादर होऊ शकेल, अशी माहिती अधीक्षक अभियंता अ. रा. नाईक यांनी दिली.

यावेळी जलसंपदा विभागाचे सचिव (प्रकल्प समन्वय) ए. एन. मुंडे, मुख्य अभियंता नाशिक प्रादेशिक विभाग, डॉ. संजय बेलसरे, कार्यकारी अभियंता सचिन पाटील व अधिकारी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com