भुयारी मार्ग सुरू करा, अन्यथा कारवाई

भुयारी मार्ग सुरू करा, अन्यथा कारवाई

रेल्वे अधिकार्‍यांना तहसीलदार मोरे यांचा निर्वाणीचा इशारा

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

नागरिकांना रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी भुयारी मार्गातील (Subway) पाणी निर्धारित वेळेत काढून निर्माण झालेले सर्व अडथळे दूर करण्यात यावे अशा स्पष्ट सुचना रेल्वे अधिकार्‍यांना देत तहसीलदार सिध्दार्थ मोरे (Tehsildar Siddharth More) यांनी या कामात दिरंगाई झाल्यास रेल्वेविरुद्ध (Raylways) कायदेशीर कारवाई करण्याचा गर्भित इशारा दिला.

रेल्वेद्वारे तयार करण्यात आलेला भुयारी मार्ग तब्बल पंधरा दिवसांपासून पाण्यात बुडालेला आहे. मुख्य बाजार पेठ असलेल्या भागाशी संपर्क तुटल्याने नांदगाव (Nandgaon) शहराच्या पूर्व भागातील नागरिकांनी केलेल्या आंदोलनाची (Movement) दखल घेत तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी त्यांच्या रेल्वेसह प्रशासकीय अधिकार्‍यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी नागरीकांच्या तक्रारी व अडचणीची गंभीरतेने दखल घेत त्यांनी वरिल इशारा दिला.

अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) शहरातील शाकंभरी आणि लेंडी नद्यांना महापूर येवून महिना उलटून देखील भुयारी मार्ग पाण्याने तुडुंब भरलेला असल्याने शहराच्या मुख्य भागाशी संपर्क खंडीत झाल्याने. नागरीकांसह विविध पक्ष संघटना, सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांतर्फे आंदोलने छेडले जात असल्याने या जनक्षोभाची दखल घेत तहसीलदार मोरे आपल्या कार्यालयात संबंधित अधिकार्‍यांची बैठक बोलावून हा प्रश्न सोडवण्यास संदर्भात पुढाकार घेतला.

आज झालेल्या बैठकीदरम्यान रेल्वे अधिकारी यांनी भुयारी मार्गातील चांडक प्लॉटच्या दिशेने असलेल्या मार्गातून पाणी येत असल्याने तो बंद करण्याची मागणी केली असता या भागातील रहिवाशांचा शहराशी असलेला संपर्क खंडित होऊ शकतो त्यामुळे तेथे पर्यायी रस्ता होईपर्यंत तो मार्ग बंद करण्यात येवू नये तसेच भुयारी मार्गातील साचलेले पाणी अतिरिक्त विद्युत पंप लावून नदीपात्रात सोडण्यात यावे तसेच अडथळा ठरत असलेले मटन मार्केट पाडल्यानंतर त्याठिकाणी रेल्वेने त्वरित

भुयारी मार्गातील पाण्याचा निचरा होण्यासाठी मोठ्या व्यासाचे पाईप टाकून ते नदीपात्रात सोडत रस्ता करावा, मागणी मुख्याधिकारी यांनी केली असता यावर वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करावी लागेल असे मत रेल्वे अधिकार्‍यांनी व्यक्त केले. यावेळी तहसीलदार मोरे यांनी रेल्वे अधिकार्‍यांना जनक्षोभ व कायदा सुव्यवस्थेचा विचार करत आपण या प्रश्नावर लवकरात लवकर मार्ग न काढल्यास आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात करावा लागेल, असे ठणकावून सांगितले.

28 दिवसांपासून पाण्यात बुडालेल्या भुयारी मार्गामुळे कैलासनगर, आनंदवाडी, नवीन वस्ती, नेहरूनगर, विवेकानंद नगर आदी भागातील हजारो रहिवाशांचे दळणवळण ठप्प झाले आहे. शाळा सुरु झाल्या असल्या तरी या भागातील एक ते दीड हजार मुलांना शहरात शाळेत जाता येत नाही. बैठकीसाठी रेल्वेचे कार्यकारी अभियंता वाडेकर, शाखा अभियंता रमेश मीना, पो.नि. अनिल कातकडे, मुख्याधिकारी विवेक धांडे, शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे व नितीन जाधव, राहुल कुटे, बंडू कायस्थ, अभियंता निकम, सहाय्यक अभियंता राहुल चोळके यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.