येवला । प्रतिनिधी Yevla

जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्था पिंपळगाव जलाल तालुका येवला या संस्थेच्या वतीने येवला ते तुळजापूर- अक्कलकोट-गाणगापूर सायकल यात्रेस आज प्रारंभ झाला.

गेल्या 14 वर्षापासून येवला ते तुळजापूर- अक्कलकोट-गाणगापूर असे सायकल यात्रेचे नियोजन केले जाते. या सायकल यात्रे दरम्यान विविध सामाजिक उपक्रम जसे सायकल चालवा -देश वाचवा, पाणी आडवा -पाणी जिरवा, बेटी बचाव, वन्यजीव संरक्षण व नैसर्गिक संसाधनांचे जतन, वाहतूक सुरक्षा तसेच रक्तदान अवयव दान अशा विविध विषयांवर संदेश व जनजागृती मोहीम राबविली जाते .

यावर्षी करोना विषाणू महामार्गामुळे ओढवलेल्या परिस्थितीत आपण आपले मानसिक व शारीरिक आरोग्य व स्वास्थ्य सुदृढ ठेवणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्या शरीरात प्रतिकार शक्ती तयार होऊन या महामारी दोन हात करण्यास सक्षम होण्याकरता आपण नियमित व्यायाम व सायकलिंग करून आपले आरोग्य सुदृढ ठेवू शकतो असा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्याचे कार्य यंदाचे सायकल यात्रे मार्फत केले जाणार आहे .

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय भोरकडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या संस्थेचा उद्देश पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबविणे व जनतेला मोटर सायकल कडून सायकल कडे वळविणे तसेच नियमित व्यायाम व सायकलिंग प्रोत्साहन देणे या उद्देशाने संस्थेची स्थापना केली आहे संस्थेचे पदाधिकारी श्री किशोर खोकले यांनी संस्थेमार्फत दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली त्यात संस्थेमार्फत दूर उन्हाळ्यामध्ये पक्षांसाठी मिशन दाणापाणी राबविले जाते. तसेच संस्थेमार्फत माझे झाड माझा सेल्फी या उपक्रमांतर्गत यंदाचे वर्षी साधारण 361 झाडांचे वृक्षारोपण केले आहे. तसेच संस्थेमार्फत रक्तदानलोकांना अन्नधान्य व संसार उपयोगी वस्तूंचे वाटप केले.

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 51-अ- ग प्रमाणे नैसर्गिक साधन संपत्ती नदी नाले सरोवरे वन्यजीव वनसंपत्तीचे संरक्षण व जतन करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे . या कर्तव्याच्या अनुषंगाने संस्थेमार्फत सायकल चालविण्यासाठी प्रवृत्त करून एक प्रकारे नैसर्गिक साधन संपत्तीची बचत करून मूलभूत कर्तव्य पार पाडीत असल्याचे सांगितले.

यंदाच्या वर्षी सायकल यात्रेमध्ये एकूण 27 सायकल यात्रींनी सहभाग नोंदविला असून यात प्रामुख्याने महिला सायकल यात्री . पूजा विक्रम आव्हाड, यांचा देखील समावेश आहे यंदाच्या वर्षी सायकल यात्रेमध्ये नवनाथ भोरकडे, किरण खोकले, गोरख घोटेकर, विक्रम आव्हाड सतीश दिघे, गणेश भोरकडे, गणेश मोरे, वासुदेव साळुंखे सचिन कुटे, मनीष खोकले, नितीन कोकाटे, गोरख घोटेकर, विवेक लगड, अरुण खोकले, वैभव मोरे, कैलास सलमुठे, गणेश सोमासे, विशाल शिंगाडे, कारभारी भोरकडे, प्रभाकर डुंबरे, लक्ष्मण बनकर, अमोल महाले, सचिन भोसले व भिकन सोनवणे यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.