सैन्य भरतीवरील स्थगिती उठवा

सैन्य भरतीवरील स्थगिती उठवा

आमदार कोकाटे यांची मागणी

सिन्नर । वार्ताहर Sinnar

कोरोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून भरती प्रक्रियाच राबविली न गेल्याने सैन्य भरतीची (Military recruitment) आस लावून बसलेल्या तरुणांना निराश व्हावे लागत आहे.

परंतु आता मुंबई ए.आर.ओ. (Mumbai A.R.O.) ची 4 नोव्हेंबर पासुन भरती प्रक्रिया असली तरी कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढल्यास या प्रक्रियेवर टांगती तलवार असल्याने आमदार माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate) यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) व कृषीमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांना यासंदर्भात पत्र पाठवून ही भरती प्रक्रिया पुढे ढकलू नये अशी मागणी केली आहे.

सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) ज्या मुलांची सैन्यात भरती होण्याची इच्छा आहे. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढल्याने दोन वर्षापासून भरती प्रक्रियास राबवण्यात आली नाही परंतु आता मुंबई ए.आर.ओ. ची 4 नोव्हेंबर पासुन भरती प्रक्रिया आहे व त्यामध्ये नाशिक, धुळे, ठाणे, रायगड, मुंबई या पाच जिल्हयाची भरती आहे.

भरतीसाठी जी मुले ऑनलाईन फॉर्म भरतील 4 नोव्हेंबर पासुन असलेली भरती प्रक्रिया पुढे ढकलु नये. एकाच जिल्हयात जास्त गर्दी होत असेल तर प्रत्येक जिल्हयात भरती प्रक्रिया करावी त्यामळे गर्दीही होणार नाही आणि मुलांना देशसेवा करण्याची संधी मिळेल. इतर राज्यांच्या धर्तीवर मुंबई आर.ओ. आर्मी भरती वरील स्थगीती उठविण्यात यावी याकरिता केंद्र सरकार डिफेन्स मंत्री महोदय याकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा अशी मागणी आ. कोकाटे यांनी केली आहे.

वयोमर्यादा वाढवावी

ज्या मुलांची अगदी मनापासुन सैन्यात भरती होवून देशसेवा करण्याची इच्छा आहे. मात्र, त्याची वयोमर्यादा जास्त होत आहे. त्यांना दोन ते तीन वर्षे वयोमर्यादा वाढवुन देश सेवा करण्याची संधी दयावी. पुढे कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढून भरती प्रक्रिया पुढे ढकलली तर ज्यांची वयमर्यादा संपत आहे त्यांना दोन वर्षे अधिक संधी मिळावी, अशी मागणी आ. कोकाटे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com