
नाशिक । प्रतिनिधी Nashik
महाराष्ट्र राज्यात येणार्या निवडणुकांसाठी तयारीला लागा, असे आदेश आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी गोपाल इटालिया यांनी केले आहे.
आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्यस्तरीय बैठक आय.एम.ए हॉल शालिमार, नाशिक येथे झाली. यावेळी राज्य समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. येणार्या निवडणुकी संदर्भात महाराष्ट्र राज्याचे प्रभारी गोपाल इटालिया, तसेच प्रदेशाध्यक्ष रंगांना राचुरे यांनी राज्यातून आलेल्या जिल्हा, तालुका पातळीवरील पदाधिकार्यांना मार्गदर्शन करताना पक्ष संघटन ग्रामीण तसेच शहरी भागामध्ये मजबूत करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.
राज्य उपाध्यक्ष किशोर माध्यन, नाशिक प्रभारी ड धनराज वंजारी, संघटन मंत्री विजय कुंभार, धनंजय शिंदे, अवेरीता गौरी, कविता सिंघल आदी पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे नियोजन आम आदमी पार्टी निवडणूक समन्वय समिती नाशिकच्या वतीने करण्यात आले होते.