नाशिक | Nashik

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या 12 सदस्यांनी आज, गोदाकाठ रामकुंड येथून नर्मदा परिक्रमेस प्रारंभ केला.

ही परिक्रमा पायी करण्याचा पायंडा पूर्वीपासून आहे. नाशिक सायकलीस्ट चे सदस्य प्रथमच 3500 की.मी. परिक्रमा सायकल वर करणार आहे. आज सकाळी 6 वाजता रामकुंड येथून गोदाजल कलशात घेऊन तसेच कपालेश्वर मंदिरात मनोभावे आरती करुन "नर्मदे हर हर" या जयघोषात सायकल राईड ची सुरुवात झाली. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष श्री राजेंद्र वानखेडे सर यांनी शुभेच्छा दिल्या.

श्रीफळ वाढवून व हिरवा झेंडा दाखवून राईड ला सुरुवात झाली. नाशिक सायकलीस्टच्या सेक्रेटरी डॉ. मनीषा रौंदळ यांनी सर्व सायकलीस्टस् चे औक्षण करून पुढील प्रवासास शुभेच्छा दिल्या.

या सायकल परिक्रमेत मुकुंद ओक, चंद्रकांत नाईक, ज्ञानेश्वर गायकवाड, अनिल वराडे, श्रीराम पवार, राजेश्वर सूर्यवंशी, शिवनारायण मिश्रा, राजेंद्र गुंजाळ, उल्हास कुलकर्णी, देशीराम चव्हाण, रामनाथ सौदाणे, दीपक शिर्के हे सहभागी झाले. ही परिक्रमा सायकलवर करण्यास एक महिन्याचा कालावधी लागणार आहे, आवश्यक लागणारे सामान हे सर्व सायकलवरच असणार आहे.

महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात या तिन्ही राज्यातून जावे लागणार आहे. अनेक उंच सखल भागातून ही परिक्रमा डोंगर कड़याच्या रांगातून सागर तटापर्यंत व पुन्हा वर अमरकंटक च्या उगमापर्यंत करायची आहे.

आरोग्याच्या दृष्टीने व पर्यावरणाच्या दृष्टीने व्यायामाचे महत्त्व या परिक्रमेत द्वारे जनजागृती करणार आहेत. तसेच स्वच्छ नर्मदा निर्मल नर्मदा हे ब्रीद वाक्य घेवुन या परिक्रमेचे आयोजन करण्यात आले.

नदीचे स्वच्छता व सुरक्षितता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, त्यासाठी हा संदेश सायकल परिक्रमा द्वारे सर्व सायकलिस्ट पोहोचवणार आहे.